Women To Get 50% Discount On Maharashtra’s MSRTC Buses l बस प्रवासात महिलांना मिळणार 50 टक्के सूट l नियम व अटी बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या l
Discount in ST travel for women :-अधिवेशनात महिलांकरिता बस प्रवासात 50 टक्के सवलतीची मोठी घोषणा झाल्यानंतर त्यांच्या अंमलबजावणीची सगळ्या महिला वाट पाहत होत्या, आणि अखेर 17 मार्चपासून सरकारकडून सवलत देण्याचा जीआर जाहीर करण्यात आला आहे.
![]() |
| Discount in TS travel for women |
आता महिलांना प्रवासात 50 % सवलत मिळाली खरी मात्र 'Discount in ST Travel for Women' प्रवासासाठी रिझर्वेशन करता येईल का? महिलांसाठी वेगळे तिकीट असणार की सर्वांना सारख्या तिकीट असणार सवलत असलेली नेमकी बस ओळखायची कशी? ए.सी. बसला सवलत असेल की नॉन ए.सी.बसला? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती आमच्या या लेखांमध्ये.
योजनेच्या नियम व अटी:-
सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेस मध्ये पन्नास टक्के सूट, आता यामध्ये साधी मिनीबस निम आराम म्हणजेच एशियाड बस विना वातानुकूलित, शयन-आसनी म्हणजे नॉन एसी, स्लीपर कोच बस, आणि शिवशाही, शिवनेरी, शिवाई या तिन्ही साध्या आणि एसी बस मध्ये 50% सवलत 17 मार्चपासून लागू करण्यात आली आहे.
दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यात महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बससाठी ही सवलत लागू असणार. महिलांसाठी सवलत वुमन स्कीम असलेल्या तिकिटांची रंगसंगती वेगळी असणार आहे.
प्रवासी भाड्यातील अपघात सहायता निधी आणि Discount in ST Travel for Women! सेवा करिता वस्तू व सेवा करची रक्कम आकारण्यात येणार. समजा तुमचा तिकीट 10 रुपये असेल, तर त्यावर तुम्हाला 50 रुपये सवलत मिळेल आणि त्यावर 2रुपये कर म्हणजे 7 रुपयांचे तिकीट काढावे लागणार.
या योजनेअंतर्गत तुम्ही राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये MSRTC कुठेही फिरू शकता पण का राज्याबाहेर जायची असेल तर तुम्हाला तिकिटाचा आहे तो दर द्यावा लागेल म्हणजे जर तुम्ही मुंबईपासून बेळगाव ला जाण्यासाठी निघालात तर तुम्हाला महाराष्ट्राच्या सेवेपर्यंतच ही 50 टक्के सवलत लागू होणार तिथून पुढे पूर्ण टिकीट आकारले जाईल महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरी वाहतुकीस महिलांनाही "Discount in ST Travel for Women" सवलत मिळणार नाही, म्हणजे तुम्ही ठाणे ते पनवेल कल्याण ते ठाणे एसटीने प्रवास करत असेल तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही...
यामध्ये महिलांना रिझर्वेशन करून प्रवास करायचा विचार करत असतील तर त्यांना ही सवलत लागू होणार नाही म्हणजे प्रवास करतानाच तुम्हाला लगेच हा तिकीट काढून या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो... यात महिलांनी पुढच्या तारखांचे आरक्षण केले असेल तर तुम्हाला परतावा मिळणार नाही.
पाच ते बारा वयोगटातील मुलींना यापूर्वी प्रमाणेच 50 टक्के सवलत म्हणजे हाप तिकीट दर आकारला जाईल
75 वर्षे वरील महिलांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना लागू होत असल्यामुळे त्यांना फुकट प्रवास करता येणार यामध्ये 65 ते 75 वयोगटापर्यंतच्या महिलांना लागू होणार...


0 Comments