Solah Somvar Vrat Katha सोळा सोमवारचा व्रत असे करावे.

Solah Somvar Vrat Katha | सोळा सोमवारची व्रत कथा अशी करावी

मित्रांनो जे-आर मराठीच्या या पोस्ट द्वारे आपण सोळा सोमवारचा व्रत कसा करावा याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत १६ सोमवार कसे व कधी करावे व त्याची पूजा कशी करावी, सोळा सोमवार व्रत कधी पासून सुरू करावे व १६ सोमवार व्रत कोणी करावा, पूजा, साहित्य, पूजा पद्धती आणि नियम याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.

Solah Somvar Vrat Katha
Solah Somvar Vrat Katha

सोळा सोमवारचा व्रत

माहिती संपूर्ण वाचून घ्या व सांगितलेल्या पद्धतीने Solah Somvar Vrat Katha करा सोळा सोमवार व्रत आपण श्रावण महिन्यापासून चालू करू शकतो या व्रताला संकट सोमवार असेही म्हणतात असे म्हटले जाते की सोळा सोमवार हे व्रत महादेवांच्या अत्यंत आवडीचा आहे हे व्रत जे कोणी मनोभावे करतील त्यांची शंभू महादेव सर्व इच्छा पूर्ण करतात म्हणून या वृत्ताला शिव महापुराण मध्ये खूप महत्त्व दिलेले आहे आणि श्रावणातला प्रत्येक दिवस महादेवांना समर्पित आहे म्हणून सोळा सोमवार हे श्रावण महिन्यापासून चालू करतात.

सोळा सोमवार हे व्रत जास्तीत जास्त महिला करतात पण हे वृत्त कोणीही केलं तरी चालतं हे व्रत पुरुषांनी केले तरी चालते किंवा कुमारिकांनी हे व्रत केले तरीही चालते .

सोळा सोमवार हे व्रत कोणी सुरू केले

माता पार्वती देवीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी सोळा सोमवारचा व्रत सुरू केले होते पुराणांमध्ये असे सांगितले आहे माता पार्वती चा जन्म हा सतीच्या दुसर्‍या रुपात झाला होता प्रत्येक जन्मात माता पार्वतीने शंभू महादेवाना आपले पती बनवण्याचे व्रत घेतले होते म्हणून माता पार्वतीने सोळा सोमवारी उपवास करून कठोर तपस्या केली आणि भगवान शंकरांना प्राप्त केले.

कल्याणकारी योजना|महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार |

सोळा सोमवार व्रत पूजेसाठी लागणारे साहित्य

सोळा सोमवार व्रत सुरू करताना पहिल्या सोमवारी शिवलिंगाचा विधीपूर्वक अभिषेक करावा व सोळा सोमवार च्या वृत्ताला सुरुवात करावी.

  • फळ
  • गोड मिठाई
  • पांढरे वस्त्र
  • धूप
  • तुपाचा दिवा
  • धोत्र्याचे फुल
  • फुले
  • पांढरे चंदन
  • अष्टगंध
  • दूध
  • दही
  • गंगाजल
  • तूप
  • साखर
  • बेलाची पाने
  • उसाचा रस
  • माता पार्वतीची शृंगार साहित्य

Solah Somvar Vrat Katha
Solah Somvar Vrat Katha

सोळा सोमवार व्रत पूजा व विधी

सूर्यदयापूर्वी पाण्यात काळे तीळ टाकून स्वच्छ स्नान करावे व व त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून महादेवासमोर सोळा सोमवार व्रत करावा व्रताचा संकल्प करण्यासाठी हातात सुपारी पाणी अक्षदा आणि काही नाणी घेऊन महादेवांचा मंत्राचा जप करावा ओम शिवशंकरमिशानम् द्वादशार्दम त्रिलोचनम्। उमाषितं देवं शिवं आवाह्यमयम्.

सोळा सोमवारची पूजा ही प्रदोष काळात केली जाते जर तुम्ही ही पूजा घरी करत असाल तर तांब्याच्या भांड्यात शिवलिंग ठेवा आणि गंगाजला मध्ये गाईचे दूध मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा व विधिपूर्वक भगवान शिवाची पूजा करा व ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा व त्यानंतर भगवान शंकराला पंचामृत अर्पण करा व त्यांना पांढरे चंदन लावा आणि महादेवाला आणि माता पार्वती ला (Solah Somvar Vrat Katha) साठी नमूद केलेली सामग्री अर्पण करून घ्या पूजा करते वेळेस महामृत्युंजय मंत्र व शिव चालीसा पाठ करा व धूप आणि तुपाचा दिवा लावून सोमवार व्रताची कथा वाचा.

Solah Somvar Vrat Katha
Solah Somvar Vrat Katha

"Solah Somvar Vrat Katha" च्या पूजेमध्ये भगवान शंकराला चुर्मा अर्पण करावा व त्यासोबतच अर्धी वाटी गव्हाच्या पिठाचा चुरमा बनवून त्यात तूप आणि गूळ मिसळून भगवान शंकराला तो अर्पण करावा किंवा तुम्ही खीर पण देऊ शकता व त्यानंतर सहकुटुंब शंकराची आरती करावी व प्रसाद कुटुंबातील सर्व व्यक्तींना वाटून घ्यावा व स्वतःला पण घ्यावा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कि प्रसाद दर सोमवारी त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी घ्यावा जिथे पूजा केली जाते.


सोळा सोमवार व्रताचे नियम

मित्रांनो श्रावण महिन्यात 'Solah Somvar Vrat Katha'  सोबतच चैत्र मार्गशीष आणि वैशाख महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून सोळा सोमवारचे व्रत सुरु करता येते सोळा सोमवारची पूजा दिवसाच्या तिसऱ्या भागात म्हणजेच चार वाजण्याच्या सुमारास सुरू करावी सूर्यास्तापूर्वी पूजा पूर्ण करून घ्यावी अशी पूजा केल्याने ही पूजा फलदायी मानली जाते सर्व वयोगटातील आणि वर्गातील लोक हे व्रत करू शकतात परंतु या व्रताच्या कठोर नियमांमुळे ज्यांना सोहळा सोमवारी उपवास करण्याची क्षमता आहे त्यांनी हे व्रत करावे.


सोळा सोमवारचे संपूर्ण व्रत पूर्ण होईपर्यंत घरांमध्ये मांसाहार केला जात नाही सोळा सोमवारचा उपवास अत्यंत कठीण मानला जातो हा सुरत विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व संततीप्राप्तीसाठी किंवा कुमारिकांनी चांगला नवरा मिळावा म्हणून सोळा सोमवारचा उपवास करतात Solah Somvar Vrat Katha उपवास करताना ब्रह्मचर्य नियमांचे पालन करणे आवश्यक आहे

महादेवाची आरती शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।

वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।

तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।१।।


जय देव जय देव जय श्रीशंकरा।।

आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।


कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा।

आर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा।

विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय. ।।२।


देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें।

त्यामाजी जें अवचित हळाहळ उठिलें।

तें त्वां असुरपषं प्राशन केलें।

नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें।। जय. ।।३।।


व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।

रघुकुलतिलक रामदासा अंतरी।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।४।।

Solah Somvar Vrat Katha
Solah Somvar Vrat Katha

सोळा सोमवार व्रताचे उद्यापन कसे करावे

मित्रांनो सोळा सोमवार व्रताचे उद्यापन हे सोळा सोमवार पूर्ण झाल्यानंतर सतराव्या सोमवारी केले जाते श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी किंवा या व्रताचे उद्यापन करणे शुभ मानले जाते तसेही कार्तिक महिना श्रावण महिना जेष्ठ महिना वैशाख महिना किंवा मार्गशीष महिना या महिन्यातील कोणत्याही सोमवारी या व्रताचे उद्यापन करू शकता.


16 सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या 17 व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करतात.

17 व्या सोमवारी उद्यापन करणे जमले नाही तर पुढे कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन करता येते.

व्रत करणारा दिवसभर उपास करतो. निर्जळी उपवास अधिक फायदेकारक असतात. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक सोमवारी निर्जळ उपास करावा. 

ज्याला उपास जमत नाहीत त्याने शिरा, खीर वगैरे "गहू, गूळ व तूप" मिळून तयार केलेले पदार्थ खाल्ले तरी चालते.

व्रत करणारा संध्याकाळी आंघोळ करून शंकराच्या मूर्तीची किंवा चित्राची बेलाच्या पानांसह पंचमोपचार पूजा करतो व "सोळा सोमवार कथा" किंवा "सोळा सोमवार माहात्म्य " ही पोथी वाचतो. नंतर "शिवस्तुती" म्हणून आरती करतो. Solah Somvar Vrat Katha

कापूर जाळून कापूर आरती देखील केली जाते.

त्यानंतर कणकेच्या चूरम्याचा प्रसाद वाटतात. ह्याच गोष्टी लागोपाठच्या सोळा सोमवारी करतात.

सर्वप्रथम पाठावर पांढरा कपडा अंथरून घ्यावा व त्यावर ती थोडीशी तांदूळ टाकून त्यावर ती शंकर भगवान व माता पार्वती ची प्रतिमा स्थापन करावी

भगवान शंकराच्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा लावा

व त्यानंतर थोडेसे तांदूळ टाकून त्यावर ती भगवान शंकराच्या आणि माता पार्वती च्या प्रतिमेसमोर कलश स्थापना करावी

व त्यानंतर मातीचे शिवलिंग बनवावे वते कलशाच्या समोर ठेवावे

व त्यानंतर सर्व देवतांचे ध्यान करून देवाला .पाणी अर्पण करावे

व त्यानंतर भगवान शंकराला पंचामृताने स्नान करून घ्यावे

आता भगवान शंकराला फुले गंध धूप नैवेद्य फळे दक्षिणा तांबूल इत्यादी अर्पण करून घ्यावे

पूजा संपन्न झाल्यावर देव बाप्पांना पूजेचे सर्व सामान दक्षिणा व कपडे दान करावे व त्याबरोबरच त्यांना जेवण करून वाट लावावे व स्वतः जेवण करावे

सोळा सोमवार व्रताचे फळ

हे व्रत केल्याने, दरिद्री धनवान होतो.
रोगी रोगमुक्‍त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते.
दु:खी माणसाला सुख प्राप्त होते.
मनातील चिंता नाहीशी होते.
दूरदेशी असलेल्या आपल्या माणसांची भेट होते.
पुत्र-कन्यांचा लाभ होतो.
कुमारिकांना मनपसंत पती मिळतो.
व्यापार्‍याला व्यापारांत फायदा होतो.
नोकरीत प्रमोशन मिळते.
सोळा सोमवार हे व्रत मनोकामना पूर्ती साठी करू शकतो अर्थात मनात श्रद्धा भाव विश्वास असेल तर नाहीतर करणे योग्य नाही ,

त्या व्रताचा महिमा थोर तर आहेच पण अतिशय भावभक्ती चा थोर साधक यशस्वी रीत्या हे व्रत पार पाडतो व इच्छेत फळं ही प्राप्त करतो,

श्रावण महिन्यात सुरुवात करावी म्हणजे कार्तीक किंवा मार्गशीष महिन्यात उध्यापन होते, किंवा माघ महिना ते वैशाख उत्तम मानला जातो,
Solah Somvar Vrat Katha
Solah Somvar Vrat Katha

त्याचे प्रकार दोन माहीत आहेत ,

एक = खडीसाखर खाऊन म्हणजे जितकी खडीसाखर आणणार त्याचे तीन भाग करून एक मंदिरात , एक गाईला व तिसरा घरात सर्वांना प्रसाद देऊन उरलेला स्वत खाणे आणि दुसऱ्या दिवशी दही भात यावर उपवास सोडणे,

दोन = चुरमा म्हणजे मलीदा , तो पण जितक्या गव्हाच्या चपातीचा म्हणजे सव्वा किंवा सव्वा दोन किंवा सव्वा पाच असे प्रमाण घेऊन त्यात

गूळ, तूप घालून करणार त्याचे तीन भाग करून वरील प्रमाणे चं करावे लागते, दर सोमवार,

या व्रताचा जास्त डामदौल न करता अतिशय नम्रता पूर्वक, कोणत्याही प्रकारे वाच्यता न करता भोळ्या भक्तीने करावे इतकंच

निष्कर्ष

हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने केल्यास तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल सोळा सोमवारचा व्रत केल्याने देवाधिदेव महादेव प्रसन्न होती आणि तुमच्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करण्यास मदत होईल.

काही निवडक प्रश्न 

  • 16 सोमवार व्रत मध्ये शारीरिक संबंध ठेवला तर चालतो का?

ज्या दिवशी तुमचा उपवास असेल त्या दिवशी शारीरिक संबंध ठेवणे हे अशुभ मानले जाते.


  • 16 सोमवार व्रत मीठ होऊ शकतो का?

सोळा सोमवार व्रत मध्ये  मीठ खाऊ शकत नाहीत.


  • 16 सोळा सोमवार व्रत का करतात?

चांगला वर प्राप्त होण्यासाठी मुली सोळा सोमवार का व्रत करतात.


  • 16  सोमवारची पूजा कोणत्या वेळी करावी?

16 सोमवारची पूजा दिवसाच्या ४ वाजण्याच्या सुमारास सुरू करावी. सूर्यास्तापूर्वी पूजा पूर्ण करावी,



सोमवारची पूजा कशी करावी ?

पाच सोमवारचे व्रत कसे करावे ?

सोळा सोमवारचे व्रत कसे करावे ?

सोळा सोमवारची कथा ?

महादेवाची आरती लावा ?

सोळा सोमवारचे उद्यापन कसे करावे ?

सोळा सोमवार व्रत कसे करावे?


प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.


https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/8-712.html?m=1 Apr 7, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Anganwadi-sevika- Mandhan.html?m=1 Apr 7, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Mulching Paper-Yojana-plastic-mulching-paper-Subsidy.html?m=1

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Village-Sevak-Recruitment.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Bhandhkam Kamgar-nondni.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Ek-Shetkari-Ek-Dp-Yojana.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Bandhkam-shishyavrutti-yojna.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Annasaheb-Patil-Karj-Yojan.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/17.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/mudra-loan-cheme .html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/vasantrao-naik-mahamandal-loan.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/PAN-Aadhar Linking.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Discount-in-ST-Travel-for-Women.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Sukanya-Samriddhi-Yojana.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/New-gold-rulesAadhaar-card-for-gold.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/ Business-Idea.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/PM-Kisan-Yojana.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/bhandhkam kamgar-yojana.html?m=1 Apr 3, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Solah-Somvar-Vrat-Katha.html?m=1 Apr 2, 2023


Post a Comment

0 Comments