Magel tyala Vihir Yojana 2023 अंतराची अट रद्द

 Magel tyala Vihir Yojana 2023 | Magel Tyala Vihir Yojana | Abolition of distance condition 

शेतकऱ्यांचे स्वप्न होणार पूर्ण l मागेल त्याला विहीर योजना 2023 | Magel Tyala Vihir Yojana |

Magel Tyala Vihir Yojana 2023 | मागेल त्याला विहीर योजना 2023 – आपली स्वतःची एक विहीर असावी, आपले ही शेत बागायत असावे असे प्रत्येक शेतकऱ्यांचे स्वप्न असते. परंतु विहीर खोदणे हे काही सोपे काम नाही. विहिर खोदण्यासाठी खूप खर्च लागतो. हा खर्च प्रत्येक शेतकरी उचलू शकत नाही. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांचे विहीरीचे स्वप्न हे स्वप्नच राहून जाते.

Magel him Vihir Yojana 2023
Magel him Vihir Yojana 2023 

परंतु आता आपले स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासन पुढे सरसावले आहे. मागेल त्याला विहीर ही योजना शासनाने आणली आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेच्या यशस्वी प्रयोगानंतर आता मागेल त्याला विहीर ही योजना शासनाने आणली आहे.

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात Magel tyala Vihir Yojana 2023  योजनेबद्दल सखोल माहिती बघणार आहोत. नेमकी मागेल त्याला विहीर ही योजना आहे तरी काय?, किती रुपये अनुदान मिळणार?, पात्रता काय आहे. अर्ज कसा करावा? अशा आपल्या सर्व शंका आम्ही येथे दूर करणार आहोत.

मागेल त्याला विहीर ही योजना नेमकी आहे तरी काय?

मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुुंब लखपती करण्याचे ठरविलेले आहे. भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 3,87,500 विहीरी खोदणे शक्य आहे.

मनरेगा अंतर्गत या विहीरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर (ठिबक / तुषार लावून) केला गेल्यास मोठ्या संख्येने कुटुुंबे लखपती होतील. पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्रय कमी करण्याबाबतीत केरळच्या बरोबरीकडे वाटचाल करेल.Magel tyala Vihir Yojana 2023

मागेल त्याला विहीर या योजनेच्या नवीन GR नुसार पात्रता व अटीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्या आपण पुढे पाहूया.

किती अनुदान मिळणार?

विहीर बनविण्यासाठी पूर्वी 03 लाख एवढे अनुदान देण्यात येत होते. आता नवीन शासन निर्णयानुसारविहीर बनविण्यासाठी 04 लाख एवढे अनुदान देण्यात येत आहे.

पात्रता व अटी काय आहे?
लाभार्थ्यांची निवड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट 1 कलम 1 (4) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहीरीची कामे अनुज्ञेय आहेत.

अनुसूचित जाती

अनुसूचित जमाती

भटक्या जमाती

निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)

दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

स्त्री करता असलेली कुटुंबे

शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे

जमीन सुधारणांचे लाभार्थी

इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी

अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी (वन हक्क मान्य करणे)

सीमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत भुधरणा)

अल्पभूधारक (05 एकर पर्यंत भुधारणा)
लाभार्थी पात्रता

लाभार्थ्याकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.

महाराष्ट्र भूजल अधिनियम १९९३ च्या कलम तीन नुसार अस्तित्वातील पेजल श्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेली आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्रोतांचा 500 मीटर परिसरात सिंचन विहीर अनुज्ञेय करू नये.

दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.Magel him Vihir Yojana 2023 

दोन सिंचन विहिरींमधील किमान 15 Magel him Vihir Yojana 2023  0 मीटर अंतराची अट ही राज Run off Zone तसेच अनुसूचित जाती व जमाती व दरिद्र्यरेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येऊ नये.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट लागू राहणार नाही.

लाभार्थीच्या ७/१२ वर याआधीच विहिरीची नोंद असू नये.

लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा.

एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमिनीचे क्षेत्र 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असावे.

ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्ड धारक असला पाहिजे.

अर्ज कसा करावा? विहीर नोंदणी अर्ज Magel him Vihir Yojana 2023 application form 

इच्छुक लाभार्थ्याने विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ- अर्जाचा नमुना व ब- संमती पत्र सोबत जोडलेले) ऑनलाइन किंवा ग्रामपंचायतच्या “अर्ज पेटीत” टाकावे. ऑनलाइन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्यांनी शक्यतोवर ऑनलाईन अर्ज करावा.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

७/१२ चा ऑनलाईन उतारा. Magel tyala Vihir Yojana 2023 

८ अ चा ऑनलाईन उतारा.

जॉब कार्ड ची प्रत.

सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा.

सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करार पत्र.

विहीर कोठे खोदावी? विहीर खोदणे नियम

दोन नाल्यांच्या मधील क्षेत्रात व नाल्यांचे संगमाजवळ जेथे मातीचा किमान 30 सेंटिमीटरचा थर व किमान पाच मीटर खोलीपर्यंत मऊ (झिजलेला खडक) आढळतो तेथे.

नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात.

जमिनीच्या सखल भागात जेथे किमान 30 सेंटिमीटर पर्यंत मातीचा थर व किमान पाच मीटर खोलीपर्यंत मुरूम (झिजलेला खडक) आढळतो.

नाल्याच्या तीरावर जेथे उंचवटा आहे तेथे परंतु सदर उंचावर चोपण किंवा चिकन माती नसावी.

घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात.

नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आत नदी पात्र नसताना देखील वाळू रेती व गारगोटे थर दिसून येते.

नदीचे / नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग.

अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत.

विहीर कोठे खोदू नये? Magel tyala Vihir Yojana 2023 

भूपृष्ठावर कडक खडक दिसणाऱ्या जागेत.

डोंगराचा कडा व आसपासचे 150 मीटरचे अंतरात.

मातीचा थर 30 सेंटिमीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.

मुरमाची (झिजलेला खडक) खोली 5 मीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.
मित्रहो, वरील लेखात आपण मागेल त्याला विहीर या योजनेची सखोल माहिती बघितली. आपला शेतकरी सोने पिकविण्याची हिम्मत ठेवतो, परंतु सतत चा दुष्काळ आणि पाण्याच्या अपुऱ्या सोईमुळे आपला शेतकरी निराश झाला आहे.

परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला विहीर योजनेमुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. स्वतःची विहीर असावी हे स्वप्न आता साकार होणार आहे.


प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.


https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/8-712.html?m=1 Apr 7, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Anganwadi-sevika- Mandhan.html?m=1 Apr 7, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Mulching Paper-Yojana-plastic-mulching-paper-Subsidy.html?m=1

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Village-Sevak-Recruitment.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Bhandhkam Kamgar-nondni.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Ek-Shetkari-Ek-Dp-Yojana.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Bandhkam-shishyavrutti-yojna.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Annasaheb-Patil-Karj-Yojan.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/17.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/mudra-loan-cheme .html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/vasantrao-naik-mahamandal-loan.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/PAN-Aadhar Linking.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Discount-in-ST-Travel-for-Women.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Sukanya-Samriddhi-Yojana.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/New-gold-rulesAadhaar-card-for-gold.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/ Business-Idea.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/PM-Kisan-Yojana.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/bhandhkam kamgar-yojana.html?m=1 Apr 3, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Solah-Somvar-Vrat-Katha.html?m=1 Apr 2, 2023

Post a Comment

0 Comments