State Scholarship Swadhar Yojana : राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकार देत आहे ५१ हजार रुपये! येथे जाणून घ्या अर्जाची संपुर्ण प्रक्रिया!
Swadhar Yojana 2022-23 | स्वाधार योजने बद्दल संपूर्ण माहिती
State Scholarship Swadhar Yojna : महाराष्ट्रात एकही विद्यार्थी शिक्षणापासून (education) वंचित राहता नये या हेतूने राज्य सरकारने स्वाधार योजना (Swadhar Yojana) अंमलात आणली आहे. इयत्ता ११ वी, १२ वी व डिप्लोमा प्रोफेशनल तसेच नॉन प्रोफेशनल विद्यार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक वर्षाला ५१ हजाराची आर्थिक (financial) मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
![]() |
| State Scholarship Swadhar Yojana |
सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यातून भविष्याला आकार देण्याच्या हेतूने ही योजना तयार करण्यात आली आहे. 'State Scholarship Swadhar Yojana' या योजने साठी पात्रता निकष, योजनेचे सविस्तर लाभ व अर्ज करण्याची पद्धत याची सविस्तर माहिती आम्ही खाली दिली आहे.
स्वाधार योजनेचे तपशील State Scholarship Swadhar Yojna
अनुसूचित जाति व नव बौद्ध समुदायातील विध्यार्थ्यांना स्वाधार योजनेचे लाभ उपलब्ध असतील.डिप्लोमा प्रोफेशनल – नॉन प्रोफेशनल शिक्षणाच्या कालावधीत राहणे व खाणे तसेच शैक्षणिक खर्चासाठी सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाईल.
State Scholarship Swadhar Yojana
मदतीची ही रक्कम प्रत्येक वर्षाला ५१,००० रुपये इवढी आहे.
स्वाधार योजनेचे पात्रता निकष- Swadhar Scholarship
इयत्ता ११ वी, १२ वी व डिप्लोमा प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल विद्यार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक वर्षाला ५१ हजाराची आर्थिक मदत मिळणार आहे.अनुसूचित जाति आणि नव बौद्ध समुदायातील सर्व विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.
State Scholarship Swadhar Yojana
उमेदवाराचे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न २.५ लाखाहून अधिक नसावे.
शैक्षणिक कालावधी 2 वर्षांहून अधिक नसावा.
उमेदवार किमान ६०% मिळवून दहावी किंवा बारावी इयत्तेमध्ये उत्तीर्ण झालेला असावा.
शारीरिक दिव्यंगत्व असणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत किमान ४०% गुण असणे गरजेचे आहे.
- 1) ओळख पुरावा ...
- 2) पत्ता पुरावा ...
- 3) वयाचा पुरावा ...
- 4) उत्पन्न प्रमाणपत्र ...
- 5) जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) ...
- 6) वैद्यकीय प्रमाणपत्र (लागू असल्यास) ...
- 7) इतर सहाय्यक कागदपत्रे
• उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – Swadhar Scholarship
विद्यार्थाकडे स्वतःचे आधार कार्ड, ओळखपत्र, ऊत्पन्नाचा दाखला, बँकेचे खाते, असणे गरजेचे आहे.


0 Comments