Anganwadi Mandhan :अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन

Anganwadi Mandhan :अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन


Anganwadi Mandhan मानधन वाढीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांकडून वारंवार आंदोलन करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने १. एप्रिलपासून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे.

Anganwadi Mandhan :अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन
अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन

१ एप्रिलपासून वाढ; दोन लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना लाभ

या निर्णयाचा लाभ राज्यातील दोन लाख सात हजार १९६१ कर्मचाऱ्यांना होणार आहे.

मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत होती.

शासनाच्या अशाच प्रकारच्या नवीन योजना साठी येथे क्लिक करा

त्यामुळे राज्य सरकारने अखेर त्यांच्या मानधनामध्ये वाढ केली.

त्यानुसार अंगणवाडी सेविकांना १० हजार, मिनी अंगणवाडी सेविकांना सात हजार २०० आणि अंगणवाडी मदतनीसांना पाच हजार ५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे.

२३ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार देण्यात येणारी ही वाढ कायम ठेवण्यात येत आहे,

असे महिला व बाल विकास विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केले.

मानधनी कर्मचारी

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात ५५३ प्रकल्पातंर्गत ९७ हजार ४७५ अंगणवाडी सेविका,

९७ हजार ४७५ मदतनीस व १३ हजार ११ मिनी अंगणवाडी सेविका असे एकूण दोन लाख सात हजार ९६१ मानधनी कर्मचारी कार्यरत आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांच्या मानधनात वेळोवेळी वाढ करण्यात येते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्र सरकारचा हिस्सा ६० टक्के व राज्य सरकारचा हिस्सा ४० टक्के असे प्रमाण आहे.


Anganwadi Mandhan वाढ अशी…. (रुपयांमध्ये)

कर्मचारी             सध्याचे मानधन सुधारित मानधन

अंगणवाडी सेविका     ८३२५              १००००

मिनी अंगणवाडी सेविक     ५९७५                ७२००

अंगणवाडी मदतनीस      ४४२५                ५५००




anganwadi

anganwadi bharti 2023 maharashtra

anganwadi sevika

e anganwadi

Post a Comment

0 Comments