LPG Rate| गॅस ग्राहकांसाठी खुशखबर, गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल इतक्या रुपयांची कपात, असे आहेत नवीन
Good news for gas consumers, gas cylinder prices have been reduced by Rs.
LPG Rate| एलपीजी गॅस (LPG) सिलेंडरच्या वाढलेल्या दराने लोक हैरान असतानाच या दरात तब्बल 92 रुपये इतकी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे एलपीजी गॅस सिलेंडरच्या वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ही कपात फक्त व्यावसायिक एलपीजी गॅस (COMMERCIAL LPG) सिलेंडरसाठीच करण्यात आली आहे.
![]() |
Good news for gas consumers, gas cylinder prices have been reduced by Rs. |
आपले नवीन आर्थिक वर्ष हे एप्रिल पासून सुरू होते. या नवीन आर्थिक वर्षात महागाईपासून काही दिलासा मिळणार का याची वाट सबंध देशभरातील जनता बघत होती. ऑईल आणि पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात केलेल्या तब्बल 92 रुपयांच्या कपातीमुळे या Lpg gas चा वापर करणाऱ्यांच्या खिशावरचा बोजा कमी झाला आहे. असं असलं तरीही घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे त्यांना आहे तीच रक्कम मोजावी लागणार आहे.
घरगुती गॅस सिलेंडर हा 14.2 किलोग्रॅमचा असतो तर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर हा 19 किलोग्रॅमचा असतो. जानेवारी 2022 पासून घरगुती Lpg gas सिलेंडरच्या दरात तब्बल चार वेळा वाढ करण्यात आली होती. तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात या वर्षीच्या जानेवारी महिन्यात 25 रुपयांची वाढ झाली होती. तसेच गेल्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये तब्बल 350 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे वापरकर्त्यांसमोर आपला खिसा मोकळा करण्यावाचून पर्याय नव्हता. मात्र आता व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 91.5 रुपये इतकी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.
देशभरात असे आहेत दर
मुंबई व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा दर 1980 रुपये आहे तर चेन्नईत 2192.50 रुपये इतका दर आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा दर 2048 आहे तर कोलकात्यात 2132 रुपये इतका दर आहे. तसेच मुंबईत घरगुती गॅस 1125 रुपये तर दिल्लीत 1103 रुपये इतका आहे.
घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा नाही
घरगुती गॅस कंपन्या ह्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला Lpg gas दरांचा आढावा घेतात. गेल्या महिन्यात घरगुती एलपीजी गॅस दरात कंपन्यांनी 50 रुपये वाढ केली होती. या नवीन आर्थिक वर्षात त्यांना काही दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र ही आशा सध्यातरी फ्लॉप ठरताना दिसत आहे.


0 Comments