शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत शेळी-मेंढी, कुक्कुटपालन गट वाटप सुरू, एवढं अनुदान मिळणार Navinya Purna Yojana 2023-24
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना गाई-म्हशी, शेळी-मेंढी पालन कुक्कुटपालन गट वाटपासाठी राबवले जाणारे पशुसंवर्धन विभागाचे एक महत्त्वपूर्ण अशी योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना . मित्रांनो याच योजनेच्या संदर्भातील काही महत्त्वाचे असे अपडेट आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
![]() |
| Navinya Purna Yojana |
सातारा जिल्ह्यात सन 2023-24 मध्ये अंशतः ठाणवंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या/मेंढ्या व १ बोकड/नर मेंढा याप्रमाणे लाभार्थीना शेळी/मेंढी वाटप करणे या योजनेमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 96 व अनुसुचित जाती प्रवर्गातील 75 लाभार्थ्यांची ऑनलाईन पध्दतीने निवड करुन ज्या लाभार्थ्यांनी (Navinya Purna Yojana online form)बँक कर्ज अथवा सुवहिस्सा रक्कम भरलेली आहे अशा लाभार्थीना शासनाचे पुण्य श्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ अंतर्गत दहिवडी प्रक्षेत्र ता. माण येथुन शेळी/मेंढी गटाची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या योजनेमध्ये लाभार्थीस शेळी/मेंढी गटाची खरेदी व विमा प्रिमियम या दोन बाबीसाठी शासनाचे अनुदान खालील प्रमाणे देय आहे.
सन 2023-24 मध्ये 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूट पालन व्यवसाय सुरु करणे, Navinya Purna Yojana या योजने अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील 14 व अनुसुचित जाती प्रवर्गातील 23 लाभार्थ्यांची ऑनलाईन पध्दतीने निवड करुन लाभ देण्यात येत आहे. या योजनेमध्ये निवड लाभार्थ्याने पक्षी गृहाचे बांधकाम व संगोपनासाठी आवश्यक उपकरणे खरेदीकरुन प्रत्यक्षपणे व्यवसाय सुरु केल्यानंतर शासनाचेखालील नमुद केल्याप्रमाणे अनुदान देय होत आहे.
शासनाचे अनुदान
अ.क्र. प्रवर्ग 1000 मांसत पक्षी (रक्कम रुपपात)
1 शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के १.६८,७५०/-
1 स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के. ५६,२५०/-
2 शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के १.१२,५००/-
2 स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के १.१२,५००/-
जिल्हयामध्ये सन 2024-24 मध्ये माहे सप्टेंबर पासुन गोवर्गीय पशुधनास मोठ्या प्रमाणात लंपी चर्म रोगाची लागण झाली होती. जिल्हयामध्ये एकूण 20422 पशुधन बाधित झाले होते. या सर्व बाधित पशुधनाला विभागामार्फत वेळीच औषधोपचार केल्यामुळे जिल्हयामध्ये फक्त 1489 पशुधनाचा मृत्यु झाला होता. 'Navinya Purna Yojana' यांपैकी 1456 मयत पशुधनास शासनाचे रुपये 377.89 लाख अनुदान पशुपालकांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले असुन राज्यामध्ये अनुदान वाटपात जिल्हा प्रथम स्थानी आहे. सदय परिस्थितीत लंपी चर्म रोगाची साथ संपूर्णपणे नियंत्रणात असुन गोवर्गीय पशुधनास वेळीच 100 टक्के रोग प्रतिबंधात्मक लसीकरणही करण्यात आले आहे.


0 Comments