बांधकाम कामगार योजना विषयी संपूर्ण माहिती : Bandhkam Kamgar Yojana
महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी विविध योजना सुरु करते त्या योजनांपैकीच एक योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना (bandhkamkamgar) बांधकाम कामगारांना रोजगार, त्यांची सामाजिक सुरक्षा, कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सहाय्य्य, त्यांच्या आरोग्यविषयी सहाय्य्य,आर्थिक सहाय्य्य तसेच त्यांच्या कल्याणासाठी विविध उपाय योजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार योजनेची सुरुवात केली आहे.
या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील केली जाते.
![]() |
| Maharashtra Bandhkam Kamgar Yojana |
Maharashtra Bandhkam Kamgar Yojana
कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे ,धोकादायक क्षेत्रांमध्ये बालकामगारांना काम न करू देणे ,तसेच रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे.सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी कार्य, कामांची स्थिती, व्यावसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी धोरणे / कार्यक्रम / योजना / प्रकल्प घालून आणि कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे, घातक व्यवसायापासून बाल श्रम काढून टाकणे आणि प्रक्रिया, श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकट करणे आणि कौशल्य विकास आणि रोजगार सेवांचा प्रचार करणे अशा अनेक बाबींचा या योजनेत सामाविष्ट्य करण्यात आल्या आहेत.
जर आपणास बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करावा लागेल.या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोप्पी आहे माझ्या परिसरातील बांधकाम कामगारांचे अर्ज मी स्वतः भरून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे त्यामुळे अर्ज करण्याची सर्व पद्धत मी तुम्हाला पुढे दिली आहे त्यामुळे तुम्ही आमची ही माहिती शेवट पर्यंत वाचा आणि या योजनेचा लाभ मिळवा.
Aadhaar Card Update: आधार कार्डधारकांसाठी खुशखबर ! सरकारने केली मोठी घोषणा ; जाणून घ्या सर्वकाही ..
महत्वाची सूचना: आम्ही बांधकाम कामगार योजनेची संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे. जर तुमच्या आजूबाजूला असे कोणी बांधकाम कामगार असतील तर त्यांना सरकारच्या या बांधकाम कामगार योजनेबद्दल अवश्य सांगा किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
योजनेचे नाव बांधकाम कामगार योजना
राज्य महाराष्ट राज्य
विभाग बांधकाम कामगार विभाग
कोणी सुरु केली महाराष्ट्र शासन
लाभार्थी बांधकाम कामगार
लाभ आर्थिक सहाय्य्य
उद्देश बांधकाम कामगारांचे सामाजिक व आर्थिक विकास करने
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
बांधकाम कामगार योजनेची उद्दीष्टे Bandhkam Kamgar Vibhag Yojana Maharashtra Purpose
महाराष्ट्र राज्यातील नोंदणी असलेल्या सर्व बांधकाम कामगारांच्या विशेष हिताच्या विविध योजना राबविणे हे बांधकाम कामगार योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
नवीन बांधकाम कामगार ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे.
बांधकाम कामगारांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचणे आणि त्यांच्याकडून विविध माहिती गोळा करणे.
राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे जीवनमान सुधारणे
योजनेच्या लाभासाठीचा अर्ज दाखल करण्याच्या पद्धतींत अधिक सुलभपणा आणणे.
कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतींत सुटसुटीतपणा आणणे.
योजनेच्या लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे.
बांधकाम कामगार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणे.
प्रत्येक बांधकाम कामगाराला नोंदणी क्रमांक देणे.
कामगारांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
योजनेअंतर्गत लाभार्थ्यास योजनेचा त्वरित लाभ देणे.
कार्यकारी क्षमतेमध्ये कुशलता आणणे.
नोंदणीच्या मान्यतेसाठी मान्यताप्राप्त अधिकाऱ्याकडून नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया
कामगारांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे
कल्याणकारी योजनांच्या व्यवस्थापनासाठी प्रगत विश्लेषण
राज्यातील कामगारांचे भविष्य उज्वल बनविणे.
शासनाच्या विविध सरकारी योजनांसाठी येथे क्लिक करा.
बांधकाम कामगार योजनेचे वैशिष्ट्ये
Bandhkam Kamgar Yojana Features
बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली कामगारांसाठी एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील बांधकाम कामगार सशक्त व आत्मनिर्भर होण्यास तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यास तसेच ते सशक्त व आत्मनिर्भर होण्यास मदत होईल.
या योजनेअंतर्गत लाभार्थी कामगारास आणि त्याच्या कुटुंबास विविध प्रकारचे लाभ दिले जातात.
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभार्थी कामगारास मिळणारे आर्थिक सहाय्य त्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केले जातात.Bandhkam Kamgar Yojana
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक सहाय्य, आरोग्यविषयक सहाय्य तसेच आर्थिक सहाय्य केले जाते.
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रकिया ऑनलाईन करण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतात त्यामुळे अर्जदार कामगारास अर्ज करण्यासाठी कुठल्याही कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे अर्जदाराचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदार अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची सर्व स्थिती आपल्या मोबाईल च्या सहाय्याने वेळोवेळी जाणून घेऊन शकतो.
8 अ आणि 7/12 उतारा ऑनलाईन मोबाईल वर कसा पहाल ? पहा संपूर्ण माहिती!
महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेचे लाभार्थी
Maharashtra Kamgar Yojana Beneficiary
बांधकाम कामगार योजनेचा लाभ नवीन इमारत बांधण्यापासून ते ती इमारत पूर्ण होईपर्यंत जे मजूर त्यामध्ये काम करतात अश्या सर्व कामगारांना या योजनेअंतर्गत नोंदणी करून या योजनांचा लाभ घेता येतो.
कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी खालील प्रमाणे आहे
Badhkam Kamgar Yojana Marathi
- तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,
- स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह,
- निर्मिती,
- पारेषण आणि पॉवर वितरण,
- पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
- तेल आणि गॅसची स्थापना,
- इलेक्ट्रिक लाईन्स,
- वायरलेस,
- रेडिओ,
- दूरदर्शन,
- इमारती,
- रस्त्यावर,
- रस्ते,
- रेल्वे,
- ट्रामवेज
- एअरफील्ड,
- सिंचन,
- ड्रेनेज,
- दूरध्वनी,
- डॅम
- नद्या,
- रक्षक,
- पाणीपुरवठा,
- टनेल,
- पुल,
- पदवीधर,
- जलविद्युत,
- पाइपलाइन,
- टावर्स,
- कूलिंग टॉवर्स,
- टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,
- ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,
- दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.,
- लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,
- रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,
- गटार व नळजोडणीची कामे.,
- वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,
- अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
- वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
- उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,
- सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,
- लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,
- जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,
- सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,
- काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.,
- कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,
- सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,
- स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,
- सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,
- जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
- माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,
- रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,
- सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.
बांधकाम कामगार योजना फायदे
Bandhkam Vibhag Kamgar Yojana Benefits
नोंदणीकृत बांधकाम कामगाराला खालीलप्रमाणे लाभ घेता येईल.
सामाजिक सुरक्षा
नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपुर्तीसाठी ३०,०००/- रूपये अनुदान दिले जाते. (विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक / प्रथम विवाह असल्याचे शपथपत्र)
नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास मोफत मध्यान्ह भोजन सुविधा दिली जाते.
नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. (पाल्याचे शाळेचे ओळखपत्र आवश्यक)
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी उपयुक्त/आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता प्रतीकुटूंब ५०००/- रुपये अर्थसहाय्य दिले जाते. (अवजारे खरेदी करणार असल्याचे कामगारांचे हमीपत्र)
नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विविध लाभ दिले जातात
नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विविध लाभ दिले जातात.
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पात्र कामगारास पूर्व शिक्षण आणि ओळख प्रशिक्षण दिले जाते
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पात्र कामगारांना मोफत सुरक्षा संच पुरविले जातात.
या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारास अत्यावश्यक संच पुरविले जातात.
दिनांक ३१ ऑगस्ट २०१४ रोजी नोंदणी जिवीत असलेल्या सवर् नोंदीत बांधकाम कामगाराना दैनंदिन गरजेच्या वस्तु खरेदीसाठी प्रति कामगार ३०.०००/- रुपये अर्थसहाय्य दिले जाईल.
Annasaheb Patil Loan Scheme 2023 : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023
शैक्षणिक सहाय्य्य
नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता १ली ते ७वी मध्ये किमान ७५ टक्के किंवा अधिक गुण असल्यास २५००/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते. (७५ टक्के हजेरीबाबतचा शाळेचा दाखला)
नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता ८वी ते १०वी मध्ये किमान ७५ टक्के किंवा अधिक गुण असल्यास प्रतिवर्षी ५०००/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते. (७५ टक्के हजेरीबाबतचा शाळेचा दाखला) 'Bandhkam Kamgar Yojana'
नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता १०वी व इयत्ता १२वी मध्ये किमान ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास १०,०००/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (किमान ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका)
नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता ११वी व इयत्ता १२वी च्या शिक्षणासाठी प्रती शैक्षणिक वर्षी १०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (इयत्ता १०वी व १२वी ची गुणपत्रिका)
नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी २०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती / बोनाफाईड)
नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेण्यासाठी, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादीसाठी प्रती शैक्षणिक वर्षी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरीता १ लाख रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरीता ६०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती / बोनाफाईड)
नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना शासनमान्य पदविकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रती शैक्षणिक वर्षी २००००/- रुपये आणि पदव्युतर पदवीका मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रती शैक्षणिक वर्षी २५,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती / बोनाफाईड)
संगणकाचे शिक्षण (MS-CIT) घेत असलेल्या नोंदणीकृत लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना, शुल्काची परीपुर्ती, तथापि MS-CIT उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास सदर शुल्काची प्रतिपुर्तीसाठी करण्यात येते. ( MSCIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / शुल्क पावती)
नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप करण्यात येईल.
आरोग्यविषयक सहाय्य्य
नोंदणी केलेल्या स्त्री लाभार्थी बांधकाम कामगारांस तसेच नोंदणी केलेल्या पुरुष लाभार्थी बांधकाम कामगारांच्या पत्नीस २ जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी १५,०००/- रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी २०,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक / शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीचे प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचाराची देयके)
लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटूंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ १ लाख रुपये वैद्यकिय सहाय्य (एका सदस्यास केवळ एकदाच आणि कुटूंबातील दोन सदस्यांपर्यंत मर्यादित) तसेच आरोग्य विमा योजना लागू नसल्यासच सदर योजनेचा लाभ दिला जातो. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर आजार असल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचार विषयक कागदपत्रे)
कामगाराने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी १ लाख रुपये मुदत बंद ठेव चा लाभ दिला जाईल. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुटुंबनियोजन शास्त्रक्रियेबाबतचे प्रमाणपत्र आणि अर्जदारास एक कन्या अपत्यापेक्षा जास्त अपत्य नसल्याचा पुरावा शपथपत्र)
नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांस ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास २ लाख रुपये आर्थिक सहाय्य तसेच नोंदीत बांधकाम कामगाराचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत २ लाख रुपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ दिला जाईल. (७५ टक्के अपंगत्व असल्याचे सक्षम वैद्यकीय अधिकारी / मंडळाचे प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचाराची देयके)
नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल.
नोंदणीकृत कामगारांची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते. (शासकीय / निमशासकीय व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेतल्याचे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र)
आर्थिक सहाय्य्य
नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला / बांधकाम कामगार kamavar असताना मृत्यू झाल्याबाबतचा पुरावा)
नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याचं कायदेशीर वारसास २ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य्य दिले जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकऱ्यानी दिलेला मृत्यू दाखला)
नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगारास अटल बांधकाम कामगार आवास शहरी अर्थसहाय्य्य योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते. (प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र)
नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगारास अटल बांधकाम कामगार आवास ग्रामीण अर्थसहाय्य्य योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते. (प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र)
घर बांधणी साठी ४.५ लाख रुपये अर्थसहाय्य (केंद्र शासन २ लाख रुपये व कल्याणकारी मंडळ २.५ लाख रुपये) दिले जाईल.
नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास १०.०००/- रुपये त्याच्या अंत्यविधीसाठी मदत स्वरूपात दिली जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला)
नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस फक्त ५ वर्षांपर्यंत प्रतिवर्षी २४,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला)
घरखरेदी किंवा घरबांधणीकरिता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची रक्कम 6 लाख किंवा 2 लाख अनुदान स्वरूपात दिली जाईल. (राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा / कर्ज विम्याची पावती / घर पती पत्नीच्या संयुक्त नावे नोंदणीकृत असल्याचा पुरावा)
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांकरीता व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत उपचाराकरीता नोंदीत बांधकाम कामगारास रु६,०००/- रुपये अर्थसहाय्य दिले जातील.
सुकन्या समृद्धी योजना मराठी 2023 | Sukanya Samriddhi Yojana in Marathi |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी अर्थ सहाय्य
Bandhkam Kamgar Yojana Financial assistance
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी अटल
Bandhkam Kamgar
आवास योजना (ग्रामीण) मंडळामार्फत राबविण्यास आणि त्यासाठी रु. १,५०,०००/- इतके अर्थसहाय्य देण्याबाबत दिनांक १४ जानेवारी,२०१९ च्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) या योजनेत लाभार्थ्याकडे जमिन असणे आवश्यक आहे.
सदर लाभार्थ्याने खरेदी केलेल्या जमीन व इतर तदनुषंगिक बाबींसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येईल.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रीय) बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) चा लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करुन घरबांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला सादर केला आहे, असे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अर्थसहाय्य मिळण्यास पात्र राहतील.
अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करुन घर बांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला देऊन अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यास जमीन खरेदी व घरबांधणीच्या अनुषंगीक बाबीसाठी केलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून रु.५०,०००/- पर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येईल.हे मंजर अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक बचत खात्यात जमा करण्यात येईल.
योजनेचे स्वरूप
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी मंजुर अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे (ग्रामीण) स्वरुप खालील प्रमाणे आहे.
मंडळाकडील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या /पती /पत्नीच्या नावावरील जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी रू. १.५० लाख अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर( MGNREGA) अनुज्ञेय असणारे रु. १८,०००/- तसेच स्वच्छ भारत अभियानद्वारे शौचालय बांधण्यासाठी अनुज्ञेय असलेले रू.१२,०००/- असे एकूण रु. ३००००/- अनुदान रु. १.५० लाखामध्ये समाविष्ट असल्याने संबधित योजनांचा दुबार लाभ देय राहणार नाही.
लाभार्थी पात्रता
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ प्रति कुटुंबासाठी असून त्याचा लाभ घेण्यासाठीची पात्रता खालील प्रमाणे आहे
१. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत (सक्रिय) असावा तथापि अर्ज करतांना तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग १ वर्षापेक्षा अधिक, बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.
२. नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांचे स्वत:च्या /पती / पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के (सिमेंट, वाळूने बांधलेले) घर नसावे. तशा आशयाचे स्वयंघोषणापत्र/ शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
३. नोंदीत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वत:च्या / पती/पत्नीच्या नावे मालकीची जागा असावी अथवा मालकीचे कच्चे घर असलेल्या त्या ठिकाणी घर बांधता येईल.
४. बांधकाम कामगारानी शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतलेला नसावा. मंडळाकडील देय गृहकर्जावरील व्याज परतावा करीता अनुज्ञेय अर्थसहाय्याचा/ अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. याबाबत त्यांनी स्वयंघोषणापत्र/शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
5.अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ प्रति कुटुंबासाठी आहे.
६. एकदा लाभ घेतल्यानंतर बांधकाम कामगार पुनश्च: या योजनेच्या लाभास पात्र राहणार नाही.
७. नोंदणीकृत (सक्रिय) बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आ.वास योजना ग्रामीणच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.
आवश्यक कागदपत्रे
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा ( (ग्रामीण) लाभ घेण्यासाठी विहीत अर्जासह खालील कागदपत्र देणे आवश्यक आहे
- सक्षम प्राधिकाऱ्याने नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेल्या ओळखपत्राची प्रत
- आधारकार्ड – स्वेच्छेने दिलेल्या आधारकार्डाची प्रत.
- ७/१२ चा उतारा/ मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र/ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा
- लाभधारकाचे स्वत:च्या नावे कार्यरत असलेल्या बचत खात्याच्या पासबुकाची छायांकीत प्रत
घराची रचना
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेतील (ग्रामीण) घराची रचना खालील प्रमाणे आहे.
अ) संपूर्ण बांधकाम विटा, वाळू व सिमेंटचे असणे आवश्यक आहे. घरकुलामध्ये एक स्वयंपाकघर व बैठक हॉल यांचा समावेश असावा. शौचालय व स्नानघर बांधणे अनिवार्य राहिल.
आ) जोत्यापासून घराची उंची कमीत कमी १० फूट असावी.
इ) छतासाठी स्थानिक गरजेनुसार मजबूत लोखंडी किंवा सिमेंट पत्रे अथवा कौलांचा वापर करण्यास मुभा राहील.
ई) घराच्या दर्शनीभागावर मंडळाचे बोधचिन्ह (लोगो) लावणे आवश्यक आहे.
बांधकाम कामगार योजनेसाठी आवश्यक पात्रता
Bandhkam Kamgar Yojana Eligibility
अर्जदार महाराष्ट राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
बांधकाम क्षेत्रातील कामगार या योजनेसाठी पात्र असतील.
महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना अटी
Bandhkam Kamgar Yojana Terms & Condition
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- बांधकाम कामगार योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील कामगारांस देण्यात येईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कामगारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- मागील १२ महिन्यामध्ये ९० दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या आत असणे आवश्यक
- या योजने अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.
- जर बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत बांधकाम कामगार योजनेचा लाभ प्राप्त करत असेल तर अशा परिस्थितीत त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- इतर क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या सुरक्षे विषयी विविध उपाय,जबाबदा-या,कर्तव्ये नमूद केलेली आहेत. तथापि, आजपर्यंतचा अनुभव पाहता सदर नियमांचे मोठ्या प्रमाणात पालन होत असल्याचे दिसत नाही. जर सुरक्षेचे नियम पाळले असते तर मागील दुर्घटनेत अनेकांचे गेलेले प्राण वाचवण्यात यश आले असते. भविष्यात अशा दुर्घटनेत बांधकाम कामगारांचे प्राण वाचावे यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने दिनांक २२ सप्टेंबर,२०१७ रोजीच्या बैठकीत मंडळातील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (Safety Kit) पुरवण्यासंदर्भात ठराव पारीत केला आहे. बांधकाम कामगारांची नोंदणी वाढविणे तसेच कामगारांची जिवीत हानी होऊ नये हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. तसेच, या योजनेद्वारे होणा-या वाटपामुळे बांधकाम कामगारांमध्ये नोंदणीचे महत्व समजेल व होणा-या जनजागृतीमुळे ते मंडळाकडे नोंदणी करण्यास आकर्षित होतील. तसेच, बांधकाम कामगारांचे संभाव्य अपघात/दुखापत इत्यादी पासून संरक्षण होईल व अशा प्रकारच्या दुर्घटना टाळता येतील.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2023 | Gai Gotha Anudan Yojana 2023
योजनेच्या अटी व शर्ती
१. मंडळाकडे नोंदणीकृत जिवीत असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पत्र राहतील. या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे भरुन दिल्यानंतर सुरक्षा संच (Safety Kit) ) पुरविण्यात येतील.
२. पात्र बांधकाम कामगारांना पुरवावयाच्या सुरक्षा संच (Safety Kit) मध्ये खालील वस्तूंचा समावेश करण्यात येईल.
- Protective Shoes (Safety shoes)
- Dust Mask (Respiratory protection)
- Hearing Protection (Earplug)
- Safety helmet
- Safety Hand gloves
- Safety Harness
- Reflective Jacket
बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच लाभ
Bandhkam Kamgar Yojana Essential Kit Benefits
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांची संख्या व महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणा-या बांधकाम कामगारांची संख्या यामध्ये तफावत आहे.सदर तफावत कमी करण्यासाठी मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर करुन, बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, तरीपण राज्यातील अजूनही मोठ्या प्रमाणात बांधकाम संस्थाकडे कार्यरत बांधकाम कामगारांची मंडळाकडे नोंदणी होण्याचे प्रमाण समाधानकारक नाही. तसेच, अशा बहुतेक बांधकाम संस्थांमध्ये कार्यरत बांधकाम कामगार हे ग्रामीण भागातून रोजगार मिळविण्यासाठी शहराकडे येतात. अशा बांधकाम कामगारांजवळ दैनंदिन वापराच्या अत्यावश्यक वस्तुंची कमतरता असते.अशा अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) पुरविणे या योजनेच्या माध्यमातून दैनंदिन वापराच्या वस्तुंची कमतरता भरुन काढण्यास तसेच बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) पुरविले जातात.
योजनेच्या अटी व शर्ती
१. मंडळाकडे नोंदणी जिवीत असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील.
कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे भरुन दिल्यानंतर अत्यावश्यक वस्तू संच (Essential kit) पुरविण्यात येतील.
२. पात्र बांधकाम कामगारांना पुरवावयाच्या अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) मध्ये खालील वस्तूंचा समावेश असेल
![]() |
Bandhkam Kamgar |
१. प्लॅस्टिक चटई (Plastic Mat )
२. मच्छरदानी (Mosquito Net )
३. सोलर टॉर्च (Solar Torch)
४. जेवणाचा डबा ( Tiffin Box )
५. पाण्याची बाटली ( Water Bottle )
६. खांद्यावरील बॅग ( Sack ) (Outer bag)
७. पत्र्याची पेटी (Galvanise Trunk)
शासनाच्या विविध सरकारी योजनांसाठी येथे क्लिक करा
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
Bandhkam Kamgar Yojana Medical Benefit
इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे सातत्याने होणारे स्थलांतर आणि कायम जोखीमीच्या परिस्थितीत करावे लागणारे काम व अशा पूरक कारणांमुळे साधारणत: बांधकाम कामगार आजारी पडत असतात. जोखीमीच्या परिस्थितीत काम करावे लागत असल्यामुळे बांधकाम कामगारांचे जीवनमान देखील असुरक्षीत स्वरुपाचे असते. त्यामुळे कायद्यातील तरतुदीस अनुसरुन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्यावर अवलंबीत कुटुंबियांना सदरहू मंडळाकडून सार्वजनिक क्षेत्रातील आरोग्य विमा योजनेचा लाभ वेळोवेळी देण्यात आलेला आहे.
तथापि, मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांना शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विमा योजनेच्या लाभाच्या परिघात आणून असे कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य विमा योजनेचे प्रभावी, नियमित आणि आश्वासक असे सुरक्षा कवच पुरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवावयाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या रुग्णालयांची अधिकची संख्या आणि मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा दर्जा हा निश्चितच चांगला असल्यामुळे तसेच विमा हप्त्यापोटी करावा लागणारा खर्च देखील कमी असल्यामुळे सदर योजनेंतर्गत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवावयाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येईल.
महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट लाभार्थी
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवीत असलेले बांधकाम कामगार व त्यांच्यावर
अवलंबित कुटुंबीय.
महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेसाठी आवश्यक पात्रता
१. लाभ घेतेवेळी नोंदीत बांधकाम कामगारांची नोंदणी जीवीत असणे अनिवार्य आहे.
२. कुटुंबियांसाठी लाभ घेण्याकरिता मंडळाच्या ओळखपत्रामध्ये कुटुंबियांचा तपशील नमूद असणे अनिवार्य आहे.
लाभार्थ्यांची ओळख
लाभार्थ्यांची ओळख ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार
कल्याणकारी मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या नोंदणी पावती व मंडळाच्या ओळखपत्रावरुन करता येईल. कुटुंबाचा पुरावा म्हणून लाभार्थ्यांचे रेशनकार्ड ग्राह्य धरले जाईल, ज्यात नोंदीत बांधकाम कामगार (नोंदणी जिवीत असलेले) यांच्यासह लाभ घेणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचे नाव समाविष्ट असणे अनिवार्य असेल. तसेच, लाभ घेतेवेळी नोंदीत बांधकाम कामगाराच्या कुटुंबियाने केंद्र/राज्य शासनाने वितरित केलेले कोणतेही एक ओळखपत्र छायाचित्रासह ( उदा. आधारकार्ड, मतदान कार्ड, वाहनचालक परवाना इ.) सादर करणे अनिवार्य असेल.
विमा हप्ता
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील पात्र लाभार्थ्यांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना या योजनेंतर्गत शासनाने निश्चित केलेली देय विमा हप्त्याची ( प्रिमीयम ) रक्कम मंडळाने सदर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य आरोग्य हमी सोसायटीस दर तीन महिन्यांनी (त्रैमासिक) बांधकाम कामगारांच्या जीवीत नोंदणीचा आढावा घेऊन अदा करेल.
बांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
Bandhkam Kamgar Yojana Documents
- नोंदणी अर्ज
- दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशनकार्ड
- अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड
- अन्नपूणा शिधापत्रिका
- केशरी शिधापत्रिका
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- उत्पन्नाचा दाखला
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- अर्जदाराचा जन्म प्रमाणपत्र (जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात ९० दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- स्थानिक पत्ता पुरावा
- कायमचा पत्ता पुरावा
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रहिवाशी पुरावा
- बँक पासबुक झेरॉक्स
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- नोंदणी फी 25/- रुपये व वार्षिक वर्गणी 60/- रुपये (5 वर्षाकरिता) व मासिक वर्गणी 1/- रुपये
बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी करण्याची पद्धत
Bandhkam Kamgar Yojana Online Registration Process
बांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
होम पेज वर गेल्यावर बांधकाम कामगार नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्या मध्ये तुम्हाला खालीलपैकी विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे
तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.
आणि Process to Form बटनावर क्लिक करायचे आहे.
आता तुमच्यासमोर बांधकाम कामगार नोंदणीचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खालीलप्रमाणे विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
- Personal Details / वैयक्तिक माहिती
- Permanent Address / कायमचा पत्ता
- Family Details / कौटुंबिक तपशील
- Bank Details / बँक तपशील
- Employer Details / नियोक्ता तपशील
- Details of the 90 Days Working Certificate / ९० दिवसांच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील
- Supporting documents / समर्थन दस्तऐवज
वरील सर्व माहिती भरून Save बटनावर क्लिक करायचं आहे.
अशा प्रकारे तुमचा बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अर्ज भरला जाईल.
Anganwadi Mandhan :अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
Bandhkam Kamgar Claim Registration Process
अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
होम पेज वर Bandhkam Kamgar Yojana दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा पर्यायावर क्लिक करायचे आहे.
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला New Claim निवडून तुमचा Registration Number टाकायचा आहे आणि Proceed to Form बटनावर क्लिक करायच आहे.
घरकुल योजनेच्या नियमित केला मोठा बदल सरपंच ग्रामसेवक यांना..
आता तुमच्यासमोर Renewal Form उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत आणि Submit बटनावर क्लिक करायचं आहे.
अशा प्रकारे तुमची Bandhkam Kamgar Yojana योजनेअंतर्गत Online Renewal प्रक्रिया पूर्ण होईल.
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अर्जात भरलेली माहिती अपडेट करायची पद्धत
Bandhkam Kamgar Application Update Process
अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
होम पेज वर आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Bandhkam Kamgar Yojana Home Page
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा Mobile Number Aadhar Card Number Acknowledgement No.टाकायचा आहे आणि Proceed to Form बटनावर क्लिक करायच आहे.
Bandhkam Kamgar Yojana Application Update Process
आता तुमच्यासमोर तुमचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला जे अद्ययावत करायचे आहे ते करून Save बटनावर क्लिक करायचं आहे.
अशा प्रकारे तुमची बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अद्ययावत प्रक्रिया पूर्ण होईल.
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लॉगिन करण्याची पद्धत
Bandhkam Kamgar Yojana Login Process
अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
होम पेज वर बांधकाम कामगार:प्रोफाइल लॉगइन करा पर्यायावर क्लिक करायचे आहे.
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा Aadhar Card Number Mobile Number.टाकायचा आहे आणि Proceed to Form बटनावर क्लिक करायच आहे.
अशा प्रकारे तुमची बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लॉगइन प्रक्रिया पूर्ण होईल
टीप:-
बांधकाम कामगार कल्याणकारी योजने संदर्भात कुठलेही प्रकारचे फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी आपण वेबसाईटला भेट देऊ शकता व डाउनलोड या पर्यायामधून सर्व प्रकारचे फॉर्म तुम्ही डाऊनलोड करू शकता.
बांधकाम कामगार योजनेसंबंधी विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न:-बांधकाम कामगार योजना कोणासाठी आहे?
Ans: हि योजना महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी आहे.
प्रश्न:- बांधकाम कामगार योजना नोंदणी शुल्क किती आहे?
Ans: या योजनेसाठी नोंदणी शुल्क २५/- रुपये आहे.
प्रश्न:-बांधकाम कामगार योजनेसाठी वयाची मर्यादा काय आहे?
Ans: या योजनेचा लाभ १८ ते ६० वर्षापर्यंत घेता येतो.
प्रश्न:-बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कोणते लाभ दिले जातात?
Ans: या योजनेअंतर्गत लाभार्थी तसेच त्यांच्या कुटुंबाला विविध प्रकारचा लाभ दिला जातो.
निष्कर्ष:-
आशा करतो कि बांधकाम कामगार अंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले बांधकाम कामगार योजना संबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/8-712.html?m=1 Apr 7, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Anganwadi-sevika- Mandhan.html?m=1 Apr 7, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Village-Sevak-Recruitment.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Bhandhkam Kamgar-nondni.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Ek-Shetkari-Ek-Dp-Yojana.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Bandhkam-shishyavrutti-yojna.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Annasaheb-Patil-Karj-Yojan.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/17.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/mudra-loan-cheme .html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/vasantrao-naik-mahamandal-loan.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/PAN-Aadhar Linking.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Discount-in-ST-Travel-for-Women.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Sukanya-Samriddhi-Yojana.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/New-gold-rulesAadhaar-card-for-gold.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/ Business-Idea.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/PM-Kisan-Yojana.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/bhandhkam kamgar-yojana.html?m=1 Apr 3, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Solah-Somvar-Vrat-Katha.html?m=1 Apr 2, 2023
mahabocw
mahabocw in
mahabocw scholarship status check
mahabocw scheme
mahabocw yojana
mahabocw online claim
mahabocw claim
mahabocw.in renewal
mahabocw form download
mahabocw renewal form
mahabocw registration form
mahabocw process from



0 Comments