गटई स्टॉल योजना 2023 : गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल
महाराष्ट्र शासन राज्यातील सुशिक्षित बेरोजगार, अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नवबौद्ध तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना तसेच राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर नागरिकांना त्यांच्या फायद्यासाठी विविध योजना राबवित असतात. त्या योजनांपैकीच एक योजना ज्या योजनेचे नाव Gatai Stall Yojana आहे.
![]() |
| Gatai Stall Yojana |
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार,ढोर, होलार,मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी समाजात त्यांना मनाचे स्थान निर्माण करून देण्याच्या उद्देशाने तसेच त्यांचा शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी Gatai Stall Yojana योजनेची सुरुवात केली आहे.
हेही वाचा:-सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी-मंत्री अब्दुल सत्तार
महाराष्ट्र राज्यामध्ये चामड्याच्या वस्तु व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती कार्यरत असून, त्यांची उपजिविका ही चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रावर अवलंबून आहे.अनुसूचित जाती प्रवर्गातील पादत्राणे दुरुस्ती करणारे व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हातान्हात बसून आपली सेवा जनतेला देत असतात. या व्यावसायिकांना ऊन, वारा व पाऊस यांपासून संरक्षण मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात १०० टक्के सहायक अनुदानावर गटई कामगारांना गटई स्टॉल देण्याची योजना दिनांक ३१.१२.१९९७ च्या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आली असून, दिनांक १४.०३.२०१३ च्या शासन निर्णयानुसार गटई स्टॉल पुरवठ्याबाबतची कार्यवाही संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत करण्यात येते
Gatai Stall Yojana
महत्वाची सूचना: आम्ही गटई स्टॉल योजनेची संपूर्ण माहिती जे.आर.मराठीच्या या लेखात दिली आहे त्यामुळे तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा. जर तुमच्या परिसरात असे कोणी गटई कामगार असतील, जे गटई स्टॉल योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि पोस्ट त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
योजनेचे नाव गटई स्टॉल योजना
विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्य विभाग
योजनेची सुरुवात २०१३
राज्य महाराष्ट्र राज्य
कोणी सुरु केली महाराष्ट्र सरकार
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील चर्मकार समाज
लाभ महाराष्ट्र शासनाकडून मोफत पत्र्याचे स्टॉल
उपलब्ध करून दिले जातात
उद्देश चर्मकार बांधवांची आर्थिक उन्नती करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
हेही वाचा:-शासकीय योजनांसाठी येथे क्लिक करा
गटई स्टॉल योजनेचा उद्देश
Gatai Stall Yojana Purpose
- चर्मकार उद्योग हा चर्मकार समाजाचा एक पारंपारिक उद्योग आहे त्यामुळे त्यांना त्यांचा चर्म उद्योग करण्यासाठी एखादे हक्काचे स्थान मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने Gatai Stall योजनेची सुरुवात केली आहे.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र रेषेखालील अनुसूचित जाती चर्मकार समुदायांचे जीवन उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- योजनेअंतर्गत जीवनमान सुधारणे
- राज्यातील चर्मकार बांधवांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
- राज्यातील चर्मकार बांधवांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे
- गटई कामगारांना स्टॉल बांधण्यासाठी आर्थिक समस्यांचा सामना करू नये तसेच कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने गटई कामगार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- गटई कामगारांचे ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण करणे हा गटई कामगार योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
- गटई कामगारांचे भविष्य उज्वल बनविणे.
![]() |
| Gatai Stall Yojana |
गटई स्टॉल योजनेचा लाभ
Gatai Stall Yojana Benefits
- रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या कारागिरांना 100 टक्के अनुदान तत्त्वावर पत्र्याचे स्टॉल पुरवले जातात व 5000/- रुपये रोख अनुदान देण्यात येते.
- चर्मकार बांधवाना त्यांच्या हक्काचे स्थान मिळण्यास मदत होते.
- चर्मकार बांधवांना गटई स्टॉल सोबत अधिकृत परवाना सुद्धा दिला जातो.
- या योजनेमुळे चर्मकार बांधवांचे उन वारा व पावसापासून संरक्षण होते कारण स्टॉल त्यांना उन, वारा आणि पावसापासून आश्रय देतात.
- चर्मकार बांधव त्यांच्या हक्काच्या स्टॉलमध्ये बसुन स्वतःचा उद्योग करू शकतात.
- गटई स्टॉल योजनेअंतर्गत चर्मकार बांधवांचे जीवनमान सुधारेल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील चर्मकार समाजाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- Gatai Stall योजनेअंतर्गत चर्मकार समाज सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- चर्मकार बांधवांना स्टॉल बांधण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
गटई स्टॉल योजनेची वैशिष्ट्ये
Gatai Stall Yojana Features
- Gatai Stall Yojana महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे.
- राज्यातील गटई कामगाराचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली हि एक महत्वाची अशी एक योजना आहे.
- आयुक्त समाज कल्याण पुणे या महामंडळामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येते.
- राज्यातील चर्मकार बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्याचा सामाजिक व आर्थिक विकास करणे तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी गटई स्टॉल योजना महत्वाची ठरणार आहे.
- या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जदाराला अर्ज करण्यासाठी कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
- महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजनांसाठी येथे क्लिक करा
- गटई स्टॉल योजनेचे लाभार्थी
- राज्यातील चर्मकार समाजातील गट कामगार गटई स्टॉल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
हेही वाचा:-महिला बचत गट कर्ज योजना : महिला कर्ज योजना
गटई स्टॉल योजनेसाठी आवश्यक पात्रता
Maharashtra Gatai Stall Yojana Eligibility
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे
- गटई स्टॉल योजनेसाठी फक्त चर्मकार समाजाचे बांधव पात्र असतील
- महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना
- महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
- थेट कर्ज योजना
- चर्मकार समाज योजना
- शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र
- खावटी अनुदान योजना
गटई स्टॉल योजेनच्या अटी
Gatai Stall Yojana Terms & Condition
- अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 50 वर्षापर्यंत असावे.
- अर्जदाराने ज्या व्यवसायाची निवड केली असेल त्या व्यवसायाचे त्याला संपूर्ण ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रुपये 98 हजार व शहरी भागासाठी रुपये एक लाख वीस हजार पर्यंत असणे आवश्यक आहे. राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रुपये एक लाख पर्यंत असणे आवश्यक आहे.
- या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे व जातीचा दाखला तहसीलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला असावा.
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे व उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला असावा.
- गटई स्टॉल योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अर्जदारांना या महामंडळाकडून (आयुक्त समाज कल्याण पुणे) अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमांतर्गत आर्थिक लाभ घेतलेला नसावा लाभार्थ्याने इतर कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही असे घोषणा पत्र देणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने स्टॉलची मागणी केलेली जागा ग्रामपंचायत, कंटेन्टमेंट बोर्ड किंवा महानगरपालिकेद्वारे भाड्याने/भाडेपट्टीवर/खरेदी केलेली/अधिकृत मोफत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे किंवा अर्जदाराची स्वतःची मालमत्ता असणे आवश्यक आहे.
- अर्जदारास स्टॉल चे वाटप झाल्यानंतर त्या स्टॉलची देखभाल,दुरुस्ती इत्यादी बाबींची जबाबदारी अर्जदाराची राहील.
- एका कुटुंबात फक्तएकच स्टॉल मंजूर केला जाईल.
- स्टॉल वाटपाबाबतचे पत्र लाभार्थ्याच्या छाया चित्रासह स्टॉलमध्ये दर्शनी भागावर लावणे बंधनकारक राहील.
- एखादा स्टॉलचे वाटप झाल्यानंतर सदर स्टॉल ची विक्री करता येणार नाही.
- सदर स्टॉल भाडेतत्त्वावर देता येणार नाही.
- लाभार्थ्यास स्टॉल हस्तांतरण करता येणार नाही.
- महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती लाभार्थ्यांवर बंधनकारक राहतील.
गटई स्टॉल योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
Gatai Stall Yojana Documents
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र
- अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला.
- अर्जदार अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र
- .बँक पासबुक झेरॉक्स
हेही वाचा:-Aadhaar Card Update: आधार कार्डधारकांसाठी खुशखबर ! सरकारने केली मोठी घोषणा ; जाणून घ्या सर्वकाही ..
गटई स्टॉल योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
Gatai Stall Yojana Registration Process
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला आपल्या जवळच्या जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जाऊन Gatai Stall योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक अशी कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.अर्ज जमा केल्याची पोच पावती घ्यावी.
गटई स्टॉल योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न १.गटाई स्टॉल योजनेअंतर्गत काय लाभ दिला जातो?
Ans: रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या कारागिरांना 100 टक्के अनुदान तत्त्वावर पत्र्याचे स्टॉल पुरवले जातात व 500/- रुपये रोख अनुदान देण्यात येते.
प्रश्न २. गटई स्टॉल योजना कोणत्या प्रवर्गासाठी आहे?
Ans: गटई योजना चर्मकार समाजातील चर्मकार,ढोर, होलार,मोची इत्यादी व्यक्तीसाठी आहे.
प्रश्न ३.गटई स्टॉल योजनेसाठी वयोमर्यादा काय आहे?
Ans: या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 50 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
प्रश्न ४.गटई स्टॉल योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?
Ans: गटई स्टॉल योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
प्रश्न ५.गटई स्टॉल योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
Ans: महाराष्ट्र राज्यातील चर्मकार समाजातील बांधव या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
निष्कर्ष:-
आशा करतो कि गटई स्टॉल योजनेअंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे. तरी देखील आपले गटई स्टॉल योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा.
प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/8-712.html?m=1 Apr 7, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Anganwadi-sevika- Mandhan.html?m=1 Apr 7, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Village-Sevak-Recruitment.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Bhandhkam Kamgar-nondni.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Ek-Shetkari-Ek-Dp-Yojana.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Bandhkam-shishyavrutti-yojna.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Annasaheb-Patil-Karj-Yojan.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/17.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/mudra-loan-cheme .html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/vasantrao-naik-mahamandal-loan.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/PAN-Aadhar Linking.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Discount-in-ST-Travel-for-Women.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Sukanya-Samriddhi-Yojana.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/New-gold-rulesAadhaar-card-for-gold.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/ Business-Idea.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/PM-Kisan-Yojana.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/bhandhkam kamgar-yojana.html?m=1 Apr 3, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Solah-Somvar-Vrat-Katha.html?m=1 Apr 2, 2023
गटई स्टॉल योजना महाराष्ट्र
Gatai Kamgar Yojana
चर्मकार समाज योजना
माज कल्याण योजना 2023
समाज कल्याण विभाग
महाराष्ट्र शासन योजना 2023
माज कल्याण योजना महाराष्ट्र 2023 pdf
Gatai Stall Yojana
गटई स्टॉल योजना
Gatai Stall Yojana Maharashta



0 Comments