डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 : Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana
Swavalamban Pension Yojana : शेतीसाठी सिंचन खूप अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी सिंचनाची व्यवस्थापन करताना शेतामध्ये विहीर किंवा बोरवेल असणे खूप गरजेचे आहे. शासनाकडून शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल हा त्यामागचा उद्देश असतो.
अशीच एक शासनाची महत्त्वपूर्ण अशी योजना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना (Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana) होय. ही योजना Swavalamban Pension Yojana महाडीबीटी फार्मर्स स्कीम पोर्टल व अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी सरकारच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येते.
![]() |
| Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 : Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana
केंद्र सरकार देशातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजनांची सुरुवात करते असते त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्या राज्यातील
शेतकऱ्याच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते त्यासाठी सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची शुरुवात करत असते त्या योजनांपैकी एक योजना जिचे नाव Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीने शासनाद्वारे विविध प्रयत्न केले जातात.
विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार |विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान
Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2023
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी कार्यात मदत करण्याच्या दृष्टीने २.५ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येते. जेणेकरून शेतकरी आपल्या शेतात आधुनिक तंत्रांचा वापर करून आपले उत्पन्न वाढवू शकतील.
आपल्या राज्यातील बहुतांश शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असतो तो कर्ज घेऊन शेतीची कामे करतो आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे शेतकरी शेतात आधुनिक तंत्राचा वापर वापर करण्यास सक्षम नसतो व तो पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे शेती करत असतो.पारंपरिक शेती करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते व वेळ सुद्धा खूप लागतो त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी कुटुंबांना त्यांच्या शेतात उपयोगी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.
सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असते त्यासाठी सरकार विविध प्रकारच्या योजना राबवित असतात. महाराष्ट्र शासनाने सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची सुरुवात केली आहे.
अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावून त्यांना Krushi Swavalamban Yojana 2023 स्वावलंबी बनवने हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत शेत
महत्त्वाची सूचना: आम्ही बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी शेतकरी असतील जे बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
योजनेचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
विभागाचे नाव कृषी विभाग
योजनेची सुरूवात 27 एप्रिल 2016
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी राज्यातील शेतकरी
लाभ २ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य
योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन/ऑफलाईन
महिला बचत गट कर्ज योजना : महिला कर्ज योजना
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे उद्दिष्ट
Maharashtra Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Purpose
- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी बनवने हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे
- राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे
- राज्यातील इतर नागरिकांना शेती करण्यासाठी आकर्षित करणे
- शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणे हा या योजनेमागचा हेतू आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
- शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना शेती उपयोगी उपकरणे खरेदी करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये या उद्देशाने स्वावलंबन योजना सुरु करण्यात आलेली आहे.
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे वैशिष्ट्ये
Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Features
- बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महाराष्ट्र शासनाद्वारे आर्थिक दृष्ट्या कमजोर शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.
- बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदार शेतकरी घरी बसून आपली मोबाईल च्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो व अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची सर्व स्थिती वेळोवेळी प्राप्त करू शकतो.यामुळे अर्जदार शेतकऱ्याला अर्ज करण्यासाठी कोणत्याच शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून अर्जदार शेतकऱ्याचा वेळ आणि पैसे यांची बचत होईल.
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतात यांत्रिकी करणाचा वापर करण्यासाठी २.५ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येते.
- राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी हि योजना महत्वाची ठरेल.
- शेतकऱ्यांना आपल्या शेतात यंत्रांचा वापर करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आणि कोणाकडून कर्ज घ्यायची सुद्धा आवश्यकता भासणार नाही.
- महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली हि एका महत्वपूर्ण योजना आहे.
- या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.
गाय गोठा बांधला असेल तर मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत अनुदान
स्वावलंबन योजना महाराष्ट्र अंतर्गत समाविष्ट कृषी कार्ये
Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana Maharashtra
1. नवीन विहीर बांधण्यासाठी अनुदान
2. जुनी विहीर दुरुस्तीसाठी अनुदान
3. शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण अनुदान
4. इनवेल बोअरिंग अनुदान
5. पंपसंच अनुदान
6. वीज जोडणी आकार अनुदान
7. ठिबक सिंचनासाठी अनुदान
8. तुषार सिंचन संच बसवण्यासाठी अनुदान
9. शेतात पीव्हीसी पाईप बसवण्यासाठी अनुदान
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान
Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana Subsidy
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान खालील प्रमाणे आहे
कृषी कार्ये अनुदान
शेतात नवीन विहिरीसाठी २.५ लाखांचे अनुदान
शेतातील जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी ५००००/- रुपये अनुदान
शेतात इनवेल बोरिंग साठी २००००/- रुपये अनुदान
शेतात पंप संच बसवण्यासाठी २००००/- रुपये अनुदान
शेतात वीज जोडणीसाठी १००००/- रुपये अनुदान
शेततळ्यांना प्लॅस्टिक अस्तरीकरण करण्यासाठी १ लाख रुपये अनुदान
शेतात ठिबक सिंचनासाठी ५००००/- रुपये अनुदान
शेतात तुषार सिंचन संच बसवण्यासाठी २५०००/- अनुदान
शेतात पीव्हीसी पाईप साठी ३००००/- अनुदान
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून वगळण्यात आलेले जिल्हे
Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana Maharashtra
डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे परंतु या योजनेतून खालील जिल्हे वगळण्यात येत आहेत.
- सातारा
- सांगली
- कोल्हापूर
- मुंबई
- सिंधुदुर्ग
- रत्नागिरी
डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाची कार्यपद्धती
Krushi Swavalamban Yojana
बापाने कर्ज काढून मुलाला शिकवले, मुलाला बारावीत एका विषयात फक्त 17 गुण मिळाले.. वडिलांनी..
नवीन विहीर पॅकेज
- नवीन विहीर पंपसंच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग
- यापूर्वी शासकीय योजनेतून लाभ घेतलेल्या व अर्धवट राहिलेल्या अपूर्ण विहिरीचे काम करण्यास या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही
- लाभार्थ्याच्या ७/१२ वर तसेच शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास या नवीन विहिरी घटकाचा लाभ घेता येणार नाही.
- नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून ५०० मिटर अंतरामध्ये दुसरी विहीर नसावी.
- नवीन विहिरीसाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतील वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
- भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाच्या नियमानुसार सेमी क्रिटिकल / क्रिटिकल / ओव्हर एक्सप्लॉयटेड क्षेत्रांमध्ये नवीन विहिरी घेण्यात येवू नये.
- नवीन विहीर पॅकेजचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना इतर पॅकेजचा लाभ घेता येणार नाही.
- नवीन विहिरी च्या कामासाठी अंदाजपत्रक तयार करून त्यास कृषी विकास अधिकारी यांची मान्यता घेणे आवश्यक राहील.
- नवीन विहिरीसाठी लाभार्थ्याची निवड होऊन कार्यारंभ आदेश दिल्यानंतर 30 दिवसाच्या आत विहिरीचे काम सुरू करणे लाभार्थ्यांवर बंधनकारक राहील.
- नवीन विहिरीसाठी लाभार्थ्याची निवड होऊन ३० दिवसात सबळ कारणाशिवाय विहिरीचे काम सुरू न केल्यास लाभार्थ्यास या पॅकेजमधून रद्द करण्यात येईल व प्रतिक्षा यादीमधून पुढील लाभार्थ्याला संधी देण्यात येईल.
- लाभार्थ्याला नवीन विहरीचे काम मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक राहील.
- विहित कालावधी संपल्यानंतर अपूर्ण राहणाऱ्या कामासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही.
- विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्याच्या बँक खात्यात यायोजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान जमा करण्यात येईल.
- नवीन विहिरीचा लाभ घेतलेला लाभार्थ्याला ७/१२ वर सदर विहरीची नोंद करून घेणे बंधनकारक राहील.
- ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी शासकीय योजनेतून विहीर घेतली असेल किंवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतकऱ्यांना पंपाच्या वीज जोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी लाभ घेता येईल. शासनाच्या कोणत्याही योजनेतून अथवा विशेष घटक योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी नवीन विहीर व जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेतला असेल अशा शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत नवीन व जुनी विहीर दुरुस्ती चा लाभ घेता येणार नाही परंतु पंपसंच, वीज जोडणी, आकार व सूक्ष्म सिंचन या घटकांना लाभ घेता येईल.
Ferfar Online Maharashtra: आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
जुनी विहिर दुरुस्त पॅकेज
- जुनी विहीर दुरुस्ती, पंपसंच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग.
- जुनी विहीर दुरुस्ती साठी लाभार्थ्यांचा प्रस्ताव तांत्रिक दृष्ट्या अयोग्य असल्यास त्याला या घटनेचा लाभ दिला जाणार नाहीत.
- तसेच प्रतीक्षा यादी मधून पुढील पात्र अर्जदाराला या घटकाचा लाभ दिला जाईल
- जुनी विहीर दुरुस्थीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याच्या ७/१२ वर जुन्या विहिरीची नोंद असणे आवश्यक आहे.
- विहिरीच्या दुरुस्थी कामास अंदाजपत्रकापेक्षा अधिक रक्कम लागल्यास लाभार्थ्याला स्वतःती रक्कम भरावी लागेल.
- जुन्या विहिरी दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करण्याबाबत लाभार्थ्यांकडून बंधनपत्र घेण्यात येईल.
इनवेल बोअरींग पॅकेज
नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याने इनवेल बोरिंग ची मागणी केल्यास त्यास २००००/- रुपये अनुदान देण्यात येईल.
इनवेल बोअरिंग चे काम पूर्ण झाल्यानंतरच या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
पंपसंच पॅकेज
पंपसंचाच्या लाभासाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना १ महिन्याच्या कालावधीत पंपसंच खरेदी करणे आवश्यक राहील अन्यथा लाभार्थी शेतकऱ्याला या पंपसंच घटनेमधून रद्द करण्यात येईल.
केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम संस्थांनी किंवा अन्य सक्षम संस्थांनी प्रमाणित केलेले पंपसंच लाभार्थ्यांना खरेदी करणे आवश्यक आहे.
पंपसंचाच्या खरेदीसाठी पूर्वसंमती मिळालेल्या लाभार्थ्याने बाजारातील अधिकृत विक्रेत्याकडूनच पंपाची खरेदी करावी तसेच स्वतःच्या आधार संलग्न बँक त्यातूनच त्या विक्रेत्या सोबत व्यवहार करावा.
पंपसंचाची खरेदी केल्यानंतर त्याबाबतचे देयक (Invoice) लाभार्थ्याने कृषी अधिकारी पंचायत समिती यांचेकडे सादर करावे त्यानंतर 15 दिवसांचे आत संबंधित लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यामध्ये एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यास मंजुरी, शासन निर्णय पहा?
वीज जोडणी आकार पॅकेज
नवीन विहीर पॅकेज / जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज / शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेजमधील किंवा आवश्यकतेनुसार केवळ वीजजोडणी मागणी करणाऱ्या लाभार्थ्याने विद्युत वितरण कंपनीकडे कोटेशन भरल्याची पावती कृषी अधिकारी पंचायत समितीयाच्याकडे सादर करावी.
सूक्ष्म सिंचन संच पॅकेज
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला सूक्ष्म सिंचन संचा करिता मंजूर मापदंडानुसार येणाऱ्या खर्चापैकी कमाल ५५ टक्के अनुदान प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति प्रेम अधिक पीक योजनेतून देण्यात येईल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या तरतुदीतून ३५ टक्के अनुदान (कमाल ५०००० मर्यादेपर्यंत) पुढील प्रमाणे देण्यात येईल.
लाभार्थ्याचा ठिबक सिंचन संच बसवण्याच्या मंजूर मापदंडानुसार एकूण खर्च १५८७३०/- व त्यापेक्षा कमी झाल्यास लाभार्थ्यांना कृषी सिंचन योजना प्रती ते अधिक पीक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या दोन घटनांच्या माध्यमातून ९० टक्के अनुदान अदा करण्यात येईल.
लाभार्थ्यांचा ठिबक सिंचन संच बसवण्याचा मंजूर मापदंडानुसार एकूण खर्च रुपये १५८७३०/- पेक्षा जास्त झाल्यास लाभार्थ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति ते अधिक योजनेतून मापदंडानुसार ५० टक्के अनुदान देण्यात येईल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या तरतुदीतून ५००००/- रुपये अनुदान देण्यात येईल.
लाभार्थ्यांचा तुषार सिंचन संच बसविण्याच्या मंजूर मापदंडानुसार एकूण खर्च ७९३६५/- रुपये व त्यापेक्षा कमी झाल्यास लाभार्थ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या दोन योजनेच्या माध्यमातून ५० टक्के अनुदान अदा करण्यात येईल.
लाभार्थ्यांचा तुषार सिंचन संच बसविण्याच्या मंजूर मापदंडानुसार एकूण खर्च ७९३६५/- रुपये व त्यापेक्षा जास्त झाल्यास लाभार्थ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक या योजनेतून ५५ टक्के अनुदान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत २५०००/- रुपये अनुदान देण्यात येईल.
शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेज
शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण, पंपसंच, वीज जोडणी आकार व सूक्ष्म सिंचन
अंदाज पत्रक निश्चित झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण पूर्ण करणे लाभार्थ्यास बंधनकारक राहील तसेच काम पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल सादर केल्या पासून १५ दिवसाच्या आत या योजनेअंतर्गत घटकाची अनुदान रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल.
ज्या अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्याने ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मागेल त्याला शेततळे या योजने अंतर्गत शेततळ्याचे काम पूर्ण केले आहे त्याच शेतकऱ्यांना या पॅकेजचा लाभ घेता येईल.
सोलर पंपासाठी अनुदान
जर शेतकऱ्यास महावितरण कंपनीकडून सोलर पंप मंजूर झाला असेल तर पंपाच्या वीज जोडणीसाठी लाभार्थ्यास हीस्याची ३००००/-रक्कम अनुदानातून महावितरण कंपनीस अदा करण्यात येईल.
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे लाभार्थी
Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana Beneficiary
राज्यातील अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध शेतकरी बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे लाभ
Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Benefits
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कृषी कार्य संबंधित कार्यासाठी ३००००/- रुपयांपासून २.५ लाखांपर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
या योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकऱ्याचे भविष्य उज्वल बनेल.
राज्यातील शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
राज्यातील नागरिक शेती करण्यासाठी प्रेरित होतील.
नागरिकांना शेती कार्य संबंधित लागणाऱ्या खर्चासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आणि कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल|गटई स्टॉल योजना 2023|
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी आवश्यक पात्रता
Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Scheme Eligibility
लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकरी असावा
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अटी
Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana Terms & Condition
- केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- शेतकर्याकडे अनुसूचित जाती नवबौद्ध जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे किमान 0.4 हेक्टरव कमाल 6.00 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याची बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे
- बचत बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न असणे आवश्यक आहे.
- दारिद्र रेषेखालील नसलेल्या अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा जास्त नसावे
- दारिद्र्यरेषेखालील पिवळे रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही परंतु त्याना जमिनीचा 7 / 12 व 8 अ उतारा सादर करणे बंधनकारक राहील.
- ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर व्यतिरिक्त इतर घटकाचा लाभ घ्यावयाचा आहे त्याच्यासाठी स्वतःच्या मालकीची किमान 0.20 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
- अर्जदाराने या आधी केंद्र तसेच राज्य सरकार द्वारे सुरु एखाद्या योजनेचा लाभ मिळवला असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्याने लाभ देण्यात येईल
- अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्याचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 1.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
शासनाच्या विविध सरकारी योजनांसाठी येथे क्लिक करा
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या अर्जाची कार्यपद्धती
Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana
- हा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यापासून इच्छुकांना एक महिन्याचा कालावधी देण्यात येईल
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची प्रत अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करावा व सादर केलेल्या अर्जाची पोच पावती घ्यावी जर अर्जदाराच्या कागदपत्रात काही उणीवा असल्यास त्याला उणीवांचा पूर्ततेचा पुरेसा कालावधी देऊन अर्ज सादर करण्यास पुरेसा वेळ देण्यात येईल.
- अर्जात काही उणिवा आढळल्यास लाभार्थ्याला तसे लेखी स्वरूपात कळविण्यात येईल व पुन्हा अर्ज सादर करण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जाईल.
- तालुक्याच्या निर्धारित लक्षापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त परिपूर्ण अर्जातून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड करण्यात येईल व उर्वरित लाभार्थ्याची लॉटरीच्या क्रमवारीनुसार प्रतिक्षा यादी तयार करण्यात येईल जर काही कारणास्तव निवड झालेल्या लाभार्थापैकी काही लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला नाही तर अशा परिस्थितीत लॉटरी च्या क्रमवारीनुसार तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीतून पुढील लाभार्थ्याची निवड करण्यात येईल.
- अंतिम निवड झालेल्या या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना लेखी स्वरूपात कृषी विकास अधिकारी यांच्य पत्रा मार्फत कळविण्यात येईल.
- वैयक्तिक पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करताना महिला व अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल एकूण मंजूर निधीपैकी 3 टक्के निधी अपंग लाभार्थ्यांकरिता राखून ठेवण्यात येईल परंतु जर एखादी महिला किंवा अपंग लाभार्थी उपलब्ध न झाल्यास इतर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आवश्यक कागदपत्रे
Swavalamban Yojana Documents
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खात्याचा तपशील
- जमिनीची कागदपत्रे
- ७/१२, ८अ
- शपथ पत्र
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
Dr Babasaheb Swavalamban Yojana
- अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकरी असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती ना भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जात चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदाराने या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द केला जाईल
- अर्जदार सर्व अटी आणि शर्तींची पूर्तता करत नसल्यास सदर अर्ज रद्द केला जाईल.
- अंतिम तारखे नंतर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही..
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया
Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Apply Online
पहिला चरण
अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
होम पेज वर नवीन युजर वर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्यासमोर रेजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून Register बटनावर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुमची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
दुसरा दुसरा
आता तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचं आहे.
तिसरा चरण
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्ज वर क्लिक करायचे आहे.
आता तुमच्यासमोर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये अर्जदाराची संपूर्ण माहिती भरण्याची आहे व आवश्यक दस्तावेज अपलोड करायचे आहेत.व तुम्हाला २४ रुपयांची नाममात्र रेजिस्ट्रेशन फीस भरायची आहे.
अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
स्वावलंबन योजना महाराष्ट्र अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल.
कृषी विभागात जाऊन डिझेल पंप अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज त्याच कार्यालयात जमा करावा लागेल.
अशा प्रकारे तुमची बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
शेतकऱ्यांचे स्वप्न होणार पूर्ण | मागेल त्याला विहीर योजना 2023 | Magel Tyala Vihir Yojana | अंतराची अट रद्द
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
Q1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत पंपसंच बसविण्यासाठी किती अनुदान दिले जाते?
Ans: या योजनेअंतर्गत पंपसंच बसवण्यासाठी 20000/- रुपये अनुदान दिले जाते.
Q 2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत शेतात वीज जोडणीसाठी किती अनुदान दिले जाते?
Ans: या योजनेअंतर्गत शेतात वीज जोडणीसाठी १००००/- रुपये अनुदान दिले जाते.
Q 3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत कोणत्या गोष्टींसाठी अनुदान दिले जाते?या योजने अंतर्गत खालील प्रमाणे अनुदान दिले जाते.
या योजने अंतर्गत खालील प्रमाणे अनुदान दिले जाते.
1. नवीन विहीर बांधण्यासाठी अनुदान
2. जुनी विहीर दुरुस्तीसाठी अनुदान
3. शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण अनुदान
4. इनवेल बोअरिंग अनुदान
5. पंपसंच अनुदान
6. वीज जोडणी आकार अनुदान
7. सूक्ष्म सिंचन संच अनुदान
Q 4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना कोणत्या प्रवर्गासाठी आहे?
Ans: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती आणि नवबौध्द प्रवर्गासाठी लागू आहे.
Q 5 डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत शेतात नवीन विहिरीसाठी किती अनुदान दिले जाते?
Ans: या योजनेअंतर्गत शेतात नवीन विहिरीसाठी २.५ लाखांचे अनुदान दिले जाते.
Q 6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत शेतात जुनी विहीर दुरुस्थीसाठी किती अनुदान दिले जाते?
Ans: या योजनेअंतर्गत शेतातील जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५००००/- रुपये अनुदान दिले जाते.
Q 7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत शेततळ्यातील प्लस्टिक अस्तरीकरणासाठी किती अनुदान दिले जाते?
Ans: या योजनेअंतर्गत शेततळ्यातील प्लस्टिक अस्तरीकरणासाठी रुपये १ लाख अनुदान दिले जाते.
Q 8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत शेतात इनवेल बोअरिंग साठी किती अनुदान दिले जाते?
Ans: या योजने अंतर्गत शेतात इनवेल बोअरिंग बसवण्यासाठी २००००/- रुपये अनुदान दिले जाते.
Q 9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत शेतात सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी किती अनुदान दिले जाते?
Ans: या योजने अंतर्गत शेतात तुषार सिंचन संच बसवण्यासाठी २५०००/- रुपये अनुदान दिले जाते.
आणि पीव्हीसी पाईप साठी ३००००/- रुपये अनुदान दिले जाते.
निष्कर्ष:-
आशा करतो कि बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana |
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना |
Maharashtra Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना |
Ambedkar Krishi Swavalamban Yojana | Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana Maharashtra |
Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana 2022
Dr Babasaheb Krushi Swavalamban Yojana | Swavalamban Yojana In Marathi|
हेही वाचा
प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.
Goat farming loan शेळी पालनासाठी मिळणार 18 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज.
गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल|गटई स्टॉल योजना 2023|
विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार |विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 : Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana
बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana
8 अ आणि 7/12 उतारा ऑनलाईन मोबाईल वर कसा पहाल ? पहा संपूर्ण माहिती!
Anganwadi Mandhan :अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन
मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र 2023 : Mulching Paper Yojana plastic mulching paper Subsidy
बांधकाम कामगार योजना 2023 : Bandhkam Kamgar Yojana
सुकन्या समृद्धी योजना मराठी 2023 | Sukanya Samriddhi Yojana in Marathi |
प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 | व्यवसाय करायची सुवर्ण संधी| mudra loan scheme
वसंतराव नाईक कर्ज योजना 2023 : vasantrao naik karj yojana
The new rules of PM Kisan Yojana पीएम किसान योजनेचे नवे नियम ...
Solah Somvar Vrat Katha सोळा सोमवारचा व्रत असे करावे.
सोन्याला आधार कार्डप्रमाणे असणार 6 अंकी कोड 6 digit code like Aadhaar card for gold
Annasaheb Patil Loan Scheme 2023 : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023
बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana
बस प्रवासात महिलांना मिळणार 50 टक्के सूट l नियम व अटी बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या l







0 Comments