शबरी घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील मागास जमातीच्या कुटुंबाना मिळणार हक्काचं घर..

शबरी घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील मागास जमातीच्या कुटुंबाना मिळणार हक्काचं घर..

हाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी विविध सरकारी योजना राबवित असते या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव shabari gharkul yojana आहे.

राज्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत तसेच ते मातीपासून तयार केलेल्या झोपड्यांमध्ये राहतात तयामुळे त्यांना ऊन,वारा.पाऊस यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने अशा अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना स्वतःचे घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी शबरी घरकुल योजनेची सुरुवात करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.

shabari gharkul yojana
shabari gharkul yojana

या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीमधील लाभार्थी कुटुंबाला २६९ चौ.फु. क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून दिले जाईल.

Shabari Gharukul Yojana

तसेच या योजनेमधील लाभार्थी कुटुंबाला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य्य देण्यात येते.

शबरी घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील आदिवासी जमातीच्या कुटुंबाना, पारधी जमातीच्या कुटुंबाना,विधवा महिला,निराधार,दुर्गम क्षेत्रातील कुटुंबाना प्राधान्य देण्यात येईल.

तसेच या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना ५ टक्के आरक्षण देण्यात येईल व दिव्यांग महिलांना देखील या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल.

या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करताना लाभार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी करूनच निवड करण्यात येईल
तसेच ग्रामसभा,पंचायत समिती,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत लाभार्थ्यांची निवड करून मजुरी देण्यात येते.



या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे शहरी भागात वार्षिक उत्पन्न १.२० लाखांपेक्षा जास्त नसावे व ग्रामीण भागात १ लाखांपेक्षा जास्त नसावे.

शबरी घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी विकास विभागाद्वारे 2022-2023 साठी राज्यात १८५४४ घरे उपलब्ध करून देण्याचा विचार केला आहे.

घराचे बांधकाम करताना लाभार्थी त्याच्या आवडीनुसार इतर बदल करून शकतो परंतु निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा जास्त लागणारी रक्कम लाभार्थ्याला स्वतः भरावी लागेल.

गोठा बांधणीसाठी जनावरांच्या टॅगिंगची अट शिथिल…


महत्त्वाची सूचना: आम्ही या योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी व्यक्ती असतील जे शबरी घरकुल योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण शबरी घरकुल योजना काय आहे, shabari gharkul yojana उद्दिष्ट काय आहे, shabari gharkul yojana वैशिष्ट्य काय आहेत, शबरी घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे फायदे काय आहेत, shabari gharkul yojana पात्रता काय आहे, shabari gharkul yojana आवश्यक कागदपत्रे काय आहेत,shabari gharkul yojana अर्ज करायची पद्धत, शबरी घरकुल योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

योजनेचे नाव                 Shabari Gharukul Yojana
विभाग                         आदिवासी विकास विभाग
राज्य                           महाराष्ट्र राज्य
लाभार्थी                       अनुसूचित जमाती श्रेणीमधील कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ

अर्ज करण्याची पद्धत     ऑफलाईन

शासनाच्या विविध सरकारी योजनांसाठी येथे क्लिक करा

शबरी घरकुल योजनेचे उद्दिष्ट्य:-

Shabari Gharukul Yojana Purpose

राज्यातील अनुसूचित जमातीतील कुटुंब मातीच्या कच्च्या झोपडीत आणि तात्पुरत्या केलेल्या निवाऱ्यात राहतात अशा कुटुंबांना राहण्यासाठी पक्की घरे उपलब्ध करून देणे हेच शबरी घरकुल योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.

शबरी घरकुल योजनेअंतर्गत घराच्या बांधकामासाठी देण्यात येणारी रक्कम मर्यादा

ग्रामीण क्षेत्र१.३२ लाख रुपयेनक्षलवादी व डोंगराळ भाग१.४२ लाख रुपयेनगरपरिषद क्षेत्र१.५० लाखनगरपालिका क्षेत्र२ लाख

शबरी घरकुल योजनेचे वैशिष्ट्य

Shabari Gharukul Yojana Features

  • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आदिवासी समुदायासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने शबरी आवास योजना सुरु केली आहे.

  • shabari gharkul yojanaअंतर्गत लाभार्थ्यांची प्राधान्य क्रमाने निवड करण्यात येते.

  • शबरी आवास योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य्य केले जाते.


शबरी घरकुल योजनेचे लाभ

Shabari Gharukul Yojana Benefits

  • शबरी घरकुल योजनेअंतर्गत कच्चे घर असणाऱ्या कुटुंबाना नवीन पक्के घर बांधकामासाठी आर्थिक सहाय्य्य केले जाते.

  • या योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी २ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य्य केले जाते.

  • राज्यातील गरीब आदीवासी कुटुंबाना या योजनेच्या माध्यमातून स्वतःचे पक्के घर मिळण्यास मदत होते.

  • शबरी घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील आदिवासी कुटुंबाचे ऊन,वारा,पाऊस यांपासून संरक्षण होईल

  • शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १२०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते.

  • मनरेगा माध्यमातून लाभार्थ्यास ९० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

शासनाच्या विविध सरकारी योजनांसाठी येथे क्लिक करा

शबरी घरकुल योजनेसाठी पात्रता

Shabari Gharukul Yojana Eligibility

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

  • राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील कुटुंब शबरी घरकुल योजनेसाठी पात्र असतील

  • शबरी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड

  • शबरी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवास ही सामाजिक,आर्थिक,जात सर्वेक्षण २०११ नुसार अत्यंत पारदर्शकपणे केली जाते.

शबरी घरकुल योजनेच्या अटी
Shabari Gharukul Yojana Terms & Condition
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबाना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार अनुसूचित जमातीच्या वर्गातील असणे बंधनकारक आहे.

  • अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे.

  • घर बांधण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे.

  • अर्जदाराचे स्वतःचे किंवा कुटुंबाचे पक्के घर असता कामा नये.

  • अर्जदार कुटुंबाचे शहरी भागात वार्षिक उत्पन्न १.२० लाख तसेच ग्रामीण भागात १ लाख यापेक्षा जास्त असता कामा नये.


शबरी घरकुल योजना कार्यपध्दती

  • शबरी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थीची निवड झाल्यानंतर लाभार्थीच्या राहत्या कच्च्या घराचे Geo Tag, Job Card Mapping केले जाते.
  • निधी वितरित करण्यासाठी लाभार्थीचे खाते PFMS प्रणालीकडे संलग्न करुन पंचायत समिती लाभार्थीची नावे जिल्हा स्तरावर मान्यतेसाठी प्रस्तावित करते. जिल्हा स्तरावरुन मान्यता प्राप्त लाभार्थ्याला तालुका स्तरावरुन पहिला हफ्ता DBT च्या साहाय्याने बँकेत जमा केला जातो.
  • लाभार्थीने स्वत:च लक्ष देऊन बांधकाम करुन घेतले पाहिजे, जेणेकरुन त्याला स्वत:च्या अपेक्षेनुसार घर बांधता येईल, यासाठी कुठल्याही कंत्राटदाराचा सहभाग या योजनेत असणार नाही
  • घर बांधणीच्या प्रत्येक टप्प्यावर Geo Tag व इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष बांधकामावर जिल्हा व तालुका स्तरावरून आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेतला जातो व त्यानुसार त्याला 2रा, 3रा, व अंतिम हप्ता भौतिक प्रगतीशी संसंगत पध्दतीने अदा केला जातो.
  • लाभार्थीस मनरेगाच्या माध्यमातून 90 दिवसांचा रोजगार दिला जातो त्यासाठी 18,000/- रू इतकी रक्करम अदा केली जाते.
  • स्वच्छ. भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणीसाठी स्वचतंत्र्यपणे 12,000/- रू इतकी रक्कम उपलब्ल करुन दिली जाते. वरील रुपरेषेनुसार बेघरांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले जाते.


शबरी घरकुल योजनेअंतर्गत देखरेख यंत्रणा

शबरी घरकुल योजनेबाबतीत योग्य‍ ते नियंत्रण राखण्यासाठी व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रालयाने आवास अँप विकसित केले आहे. ज्या‍मुळे योजनेचे काम अत्यंत पारदर्शकपणे पार पाडले जाते.

योजनेचे सनियंत्रण जिल्हा स्ततरावर जि.ग्रा.वि.यं. येथून व तालुका स्तेरावर पंचायत समिती या यंत्रणाच्या माध्यमातून केले जाते.

शबरी घरकुल योजनेअंतर्गत विशेष उपक्रम

काही बेघरांकडे स्वत:च्या: मालकीची जागा नसल्याने त्यांना घरकुलाचे लाभ देणे अशक्य होते. त्यासाठी केंद्र शासनाने पंडित दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेकरिता 50,000/- किंवा प्रत्य‍क्ष जमिनीची किंमत यांपैकी जी रक्कम कमी असेल ती या योजनेतुन मंजूर केली जाते. जेणे करुन प्रत्येक गरीब कुंटुबाला स्वत:चे घर उपलब्धे होईल.

शबरी घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Shabari Gharukul Yojana Documents

  • आधार कार्ड

  • रेशन कार्ड

  • रहिवाशी प्रमाणपत्र

  • पासपोर्ट साईज फोटो

  • मोबाईल नंबर

  • ई-मेल आयडी

  • उत्पन्नाचा दाखला

  • वयाचा दाखला

  • जात प्रमाणपत्र

  • दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र

  • जागेचा ७/१२ उतारा तसेच ८अ दाखला

  • ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र

  • बँक खात्याचा तपशील



शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

Shabari Gharukul Yojana Application Process

अर्जदाराने शबरी घरकुल योजनेचा अर्ज आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करून तो  भरून त्या सोबत आवश्यकता अशी कागदपत्रांच्या छायांकित प्रति जोडून सदर अर्ज आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिला कार्यालयात आदिवासी विकास प्रकल्प संबधित अधिकारी यांच्याकडे जमा करावा.

शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा

ग्रामपंचायत – ग्रामसेवक


पंचायत समिती – गट विकास अधिकारी


जिल्हास्तर – प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता बँका देणार वाढीव पीककर्ज, कोणत्या पिकाला किती कर्ज?


शबरी घरकुल योजनेसंदर्भात विचारले जाणारे प्रश्न

Q. शबरी घरकुल योजनेसाठी उत्पन्न मर्यादा काय आहे?

Ans: शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे शहरी भागात वार्षिक उत्पन्न १.२० लाखांपेक्षा जास्त नसावे व ग्रामीण भागात १ लाखांपेक्षा जास्त नसावे.

Q. शबरी घरकुल योजनेअंतर्गत घराच्या बांधकामासाठी देण्यात येणारी रक्कम मर्यादा काय आहे?

अ) ग्रामीण क्षेत्र १.३२ लाख रुपये
ब) नक्षलवादी व डोंगराळ भाग १.४२ लाख रुपये
क) नगरपरिषद क्षेत्र १.५० लाख
ड) नगरपालिका क्षेत्र २ लाख


Q. शबरी घरकुल योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

Ans: शबरी घरकुल योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.


Q. शबरी घरकुल योजना चे लाभार्थी कोण आहेत?

Ans: महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील कुटुंब या योजनेसाठी पात्र आहेत.


निष्कर्ष:-

आशा करतो कि शबरी घरकुल योजनेअंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले शबरी घरकुल योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

शबरी आवास योजना | shabari gharkul scheme | shabari gharkul yojana application form | shabari gharkul yojana maharashtra | shabari gharkul yojana registration | शबरी आवास योजना | शबरी घरकुल योजना फॉर्म| shabari gharkul yojana 2023 | shabari gharkul yojana anudan | shabri gharkul yojana | शबरी घरकुल योजना 2023 | shabari aawas yojana |


हेही वाचा:-

 प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.


शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता बँका देणार वाढीव पीककर्ज, कोणत्या पिकाला किती कर्ज?


Goat farming loan शेळी पालनासाठी मिळणार 18 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज.


गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल|गटई स्टॉल योजना 2023|

विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार |विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 : Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana


बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana


8 अ आणि 7/12 उतारा ऑनलाईन मोबाईल वर कसा पहाल ? पहा संपूर्ण माहिती!


Anganwadi Mandhan :अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन


मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र 2023 : Mulching Paper Yojana plastic mulching paper Subsidy


बांधकाम कामगार योजना 2023 : Bandhkam Kamgar Yojana


सुकन्या समृद्धी योजना मराठी 2023 | Sukanya Samriddhi Yojana in Marathi |


प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 | व्यवसाय करायची सुवर्ण संधी| mudra loan scheme


वसंतराव नाईक कर्ज योजना 2023 : vasantrao naik karj yojana


The new rules of PM Kisan Yojana पीएम किसान योजनेचे नवे नियम ...

Solah Somvar Vrat Katha सोळा सोमवारचा व्रत असे करावे.


सोन्याला आधार कार्डप्रमाणे असणार 6 अंकी कोड 6 digit code like Aadhaar card for gold


Annasaheb Patil Loan Scheme 2023 : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023


बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana


PAN-Aadhar Linking :31 मार्च 2023 पूर्वी हे काम न केल्यास पॅन निष्क्रिय होईल! इनकम टैक्स विभागाचा इशारा!


बस प्रवासात महिलांना मिळणार 50 टक्के सूट l नियम व अटी बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या l


Ek Shetkari Ek Dp Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यामध्ये एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यास मंजुरी, शासन निर्णय पहा?

Post a Comment

0 Comments